Tarun Bharat

म्हावळींगेत फायर रेंजमुळे घडणारे प्रकार गंभीर बंदुकीच्या गोळय़ा माणसांना लागणे दुर्दैवी.

चार दिवसात पोलीसांनी गुन्हा नोंदवावा. अन्यथा उच्च न्यायालयात जाऊ. गोवा फोरवर्ड सरदेसाईंचे सरकारला आव्हान

डिचोली/प्रतिनिधी

मये मतदार संघातील म्हावळींगे गावात एका महिलेला लागलेल्या बंदूकीतील गोळी प्रकरणी गोवा फोरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई बरेच आक्रमक झाले असून त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. म्हावळींगे येथे पोलीस व अन्य प्रशिक्षणार्थिंना बंदुकीचे प्रशिक्षण देण्यासाठी येथे फायर रेंज आहे. पण सध्या येथील गावकऱयांसाठी हा जिवावरील खेळ झाला आहे. डिचोली पोलीसांनी या प्रकरणी चार दिवसांच्या आत रितसर गुन्हा नों?दवावा अन्यथा आम्ही गोवा फोरवर्डतर्फे उच्च न्यायालयात दाद मागु असा इशारा गोवा फोरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी दिला आहे.

मये मतदारसंघ दौऱया दरम्यान म्हावळींगे येथे गोळी लागुन जखमी झालेल्या पिडीत महीला उर्मीला उमेश गावकर यांच्या घरी घेतलेल्या पत्रकार परिषदेत श्री सरदेसाई बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत कार्याध्यक्ष किरण कांदोळकर, संतोषकुमार सावंत, पिडीत महिला व तिचे कुटुंबीय उपस्थित होते.

जानेवारी महीन्या मधील ही  घटना आहे. पिडीत महीला आपल्या छोटय़ा मुलासमवेत आपल्या घराच्या परसात कपडे धुत असताना ही घटना घडली होती. तिच्या पायाला काहीतरी लागल्याचे तिला कळले. काही वेळाने तिला वेदना होऊ लागल्याने घरच्या मंडळींनी तिला डिचोली प्राथमीक आरोग्य केंद्रात नेले. त्यांनी प्रथमोपचार करुन तिला घरी पाठवले व रोज बॅन्ड?ज करायला येण्यास सांगितले. आठ दिवस सतत बॅन्ड?ज केली. पण जखम मात्र वाढु लागली व पाय सुजला. तेव्हा तिला बांबोळी ईस्पितळात जाण्यास सांगीतले. येथे गेल्यावर पायाचा एक्सरे काढला असत पायात बंदुकीची गोळी असल्याचे कळले. शस्त्रक्रिया करुन ही गोळी काढण्यात आली.

हे प्रकरण फारच गंभीर आहे.  म्हावळि?गेतील फायर रेंज ही गावकऱयांसाठी “काळ” ठरु नये. एक तर ही फायर रेंज बंद करा किंवा कायमस्वरुपी गोळय़ा बाहेर जाणार नाहीत या करिता सुरक्षतेची हमी सरकारने घ्यावी. गोळी लागणे हा गंभीर गुन्हा आहे. पोलिसांनी यावर फौजदारी गुन्हा नोंदवावा, अन्यथा गोवा फोरवर्डतर्फे संतोषकुमार सावंत उच्च न्यायालयात न्यायासाठी दाद मागणार असे सरदेसाई यांनी यावेळी सांगितले.

अशा कितीतरी गोळय़ा गावकऱयांकडे आहेत. गोळय़ा घरांवर पडुन कौले फुटण्याचे प्रकार या फायर रेंजवरून होणाऱया प्रशिक्षणावेळी घडतच असतात, असे गावकऱयांनी यावेळी सांगितले. हा प्रकार संतापजनक आहे. मुख्यमंत्री येथे दौरा करुन नोकऱयांचे आमिष दाखवतात पण या प्रकाराबद्दल मात्र तोंडातुन ब्र काढत नाही. आमदाराच्या भुमिकेबद्दलही शंका येते. जर या प्रकरणाने एखाद्याचा जिव गेला असता तर सरकार अशीच उदासिनता दाखवणार का ? असा प्रश्न सरदेसाई यांनी उपस्थित केला आहे. आम्हाला येथे कोणतेही राजकारण करायचे नाही. पीडीतेला न्याय मिळावा म्हणूनच आज तिच्या घरी येऊन पत्रकार परिषद घेतल्याचे सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

Related Stories

मडगाव नगरपालिका चौकात दोन दिवस कार्निव्हल कार्यक्रम

Amit Kulkarni

‘आप’तर्फे कौशल्य मार्गदर्शन

Patil_p

राष्ट्रपतीपदासाठी गोव्यात 100 टक्के मतदान

Amit Kulkarni

‘फिफा’च्या होर्डिंग्जवरून साग संचालकावर ‘किक’!

Patil_p

किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा प्रकरणी नव्याने जनसुनावणी घ्या

Amit Kulkarni

विधानसभा अधिवेशनात 751 प्रश्न

Amit Kulkarni