Tarun Bharat

म्हैसाळ परीसरात गव्याचा धुमाकूळ

Advertisements

वार्ताहर / म्हैसाळ

आज दुपारी म्हैसाळ ढवळी रोडवर कृष्णा नदीकाठच्या शिवारात गवा ऊस शेतीत फिरत असल्याचे ग्रामपंचायत सदस्य पुष्पराज शिंदे म्हैसाळकर व त्याच्या सोबतच्या मित्रांना आढळून आले. त्यामुळे शिंदे यांनी परीसरातील‌ शेतकऱ्यांना जागृत करून सावधानता बाळगण्याचे आवाहन केले. हा गवा आज दिवसभर ढवळी, म्हैसाळ बंधारा पुढे कर्नाटक सिमेवर वरून सारखा धावत गेला आहे.

म्हैसाळसह परीसरात गवा रेड्याचे दर्शन झाल्याने शेतकर्‍यांसह ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गव्याला पाहण्यासाठी शेतकरी ग्रामस्थ शेत शिवारात गर्दी करीत असल्याने लोकांना पाहून गवा भांबावून परीसरात धुमाकूळ घातला आहे. दरम्यान शिंदे यांनी संबंधित वनअधिकार्‍यांशी संपर्क साधत तातडीने घटनास्थळी येऊन बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. गव्याच्या या वावरण्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये चिंता वाढली आहे.

Related Stories

किरकोळ कारणातून तरुणाला भोकसले,अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

सांगली : ‘तो’ चाकू हल्ला मोबाईल चॅटींगच्या वादातूनच

Abhijeet Shinde

सांगलीत एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

Sumit Tambekar

मिरजेत ओढ्याला पूर, घरांमध्ये शिरले पाणी

Abhijeet Shinde

कसबे डिग्रज नळ पाणीपुरवठा योजनेस मान्यता

Sumit Tambekar

सांगली : बसस्थानकावरील व्यावसायिकांना नाममात्र भाडे आकारणी करा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!