Tarun Bharat

म्हैसूर : दसरा महोत्सव आयोजनावर प्रश्नचिन्ह

बेंगळूर/प्रतिनिधी

मागील वर्षी दुष्काळामुळे म्हैसूर दसरा महोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला होता, परंतु यावेळी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने या कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंताही दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना परिस्थितीत नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन उपाययोजना राबवत आहे. कोरोनामुळे अनेक सण साधेपणाने साजरे करण्यात आले आहेत. तर अनेक सण रद्द देखील करण्यात आले आहेत. त्यामुळे यावर्षीचा म्हैसूर मधील दसरा महोत्सव रद्द होण्याची शक्यता आहे. पण राज्य सरकारने यासंदर्भात अद्याप कोणताही आदेश जारी केलेला नाही. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दहा दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची तयारी काही दिवस आधी सुरु होते. पण यावेळी अद्याप कोणतीही तयारी झालेली नाही.

सहकार आणि जिल्हा प्रभारी मंत्री एस.टी. सोमशेखर यांच्याकडेही याविषयी काही माहिती नाही. गेल्या वर्षी दसरा महोत्सव आयोजित करण्याची जबाबदारी गृहनिर्माण मंत्री व्ही. सोमण्णा यांच्यावर सोपविण्यात आली होती, त्यांनी एप्रिलपासूनच बैठकांना सुरुवात केली होती. परंतु यावेळी तयारीसाठी एकही बैठक झाली नाही. जिल्हा प्रशासन राज्य सरकारच्या आदेशाची वाट पाहत आहे.परंतु कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यास, यावर्षी दसरा महोत्सवाला अनुमती मिळण्याची शक्यता कमी आहे.

Related Stories

ऑस्ट्रेलियन संघात एलीस पेरीला स्थान

Patil_p

तालुक्यातील सीमेवर तीन चेकपोस्ट

Patil_p

बुडा बैठक गैरहजर प्रकरणी सर्वपक्षीय मोर्चा

Amit Kulkarni

जुने बेळगाव येथे धारूर किल्ल्याची प्रतिकृती

Patil_p

एपीएमसीत कांदा दरात मोठी घसरण

Amit Kulkarni

शिक्षकांचा ‘चलो बेंगळूर’चा नारा

Patil_p