Tarun Bharat

म. ए. समिती कोविड केअर सेंटरला भाकोजी कुटुंबीयांकडून मदत

प्रतिनिधी / बेळगाव

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आयसोलेशन सेंटरला दुर्वा रमाकांत भाकोजी हिच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त तिची आई पल्लवी आणि आजोबा प्रभाकर भाकोजी यांनी 15 हजार रुपयांची देणगी दिली आहे.

मदन बामणे यांच्याकडे हा निधी सुपूर्द करण्यात आला. वाढदिवस अनेक जण मोठय़ा उत्साहाने साजरा करतात. मित्र-मैत्रीणी, पै-पाहुणे बोलावून साजरा केला जातो. मात्र त्याला फाटा देत भाकोजी कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. कोविड रुग्णांना बरे करण्यासाठी म. ए. युवा समितीचे कार्यकर्ते धडपडत आहेत. त्यांना ही आर्थिक मदत देण्यात आली आहे. यावेळी माजी नगरसेवक नेताजी जाधव, दिलीप दळवी, श्रीनाथ भाकोजी, महादेव पाटील उपस्थित होते.

Related Stories

सक्रिय रुग्णांच्या संख्येतही घट

Patil_p

वाढीव जीएसटी कमी करण्याची मागणी

Amit Kulkarni

म. ए. समितीच्या आयसोलेशन सेंटरला आर्थिक मदत

Patil_p

मध्यवर्ती बसस्थानकावर लुटमार करणाऱया टोळीची दहशत

Amit Kulkarni

राज्यस्तरीय टेटे स्पर्धेत सान्वी, आयुषी, तनिष्का विजेते

Amit Kulkarni

रुद्रस्वामी मठावर रथोत्सव हजारो भाविकांची उपस्थिती

mithun mane