Tarun Bharat

म मॅरेथॉनचा पुस्तक आले भेटीला

डॉ. संदीप काटे यांच्या खुमासदार लेखणीतून

प्रतिनिधी/ सातारा

सातारला नव्याने हाफ हिल मॅरेथॉनची ओळख करुन देणारे डॉ. संदीप काटे हे व्यक्तीमत्व एक डॉक्टर असूनही फिटनेस फंडा म्हणून स्वतः धावपट्टु आहेत. स्वतः बरोबरच त्यांनी अवघ्या साताऱयाची ओळख सातारा हाफ हिल मॅरेथॉन अशी करुन दिली. त्यांनी स्वतः लेखन केलेले म मॅरेथॉनचा हे बहुचर्चित पुस्तक साताऱयात आले आहे. या पुस्तक धावपट्टूंसाठी मार्गदर्शक असे आहे. दि. 27  रोजी सायंकाळी 7 वाजता लाईव्ह प्रकाशन सोहळा होणार आहे, असेही डॉ. संदीप काटे यांनी सांगितले. 

साताऱयाला जशी ऐतिहासिक परंपरा आहे. तशीच रांगडया साताऱयाच्या मातीतली रांगडी माणस आहेत. साताऱयाच्या मातीतले डॉ. संदीप काटे हे स्वतः उत्कृष्ट धावपट्टू आहेत. त्यांनी धावण्याबरोबरच साताऱयात सातारा हाफ हिल मॅरेथॉन ही संकल्पना सुरु केली. स्वतः सर्वांना सोबत घेवून साताऱयाची नवीन ओळख तयार केली ती केवळ सातारकरांसाठी. कोणताही मनात किंतू न ठेवता केवळ सातारकर म्हणून त्यांनी धावण्याची चळवळ सुरु केली. बघता बघता सातारा हाफ हिल मॅरेथॉनला पहिल्या वर्षापासून जगभरातून प्रतिसाद मिळू लागला. साताऱयात जगातून धावपट्टू खास मॅरेथॉनसाठी येवू लागले. पोलीस, अधिकारी, राजकीय नेते यांना धावण्याचे, व्यायामचे महत्व पटू लागले. धावण्याची ही स्पर्धा साताऱयासाठी एक इव्हेंट न बनता सातारकरांचा भाग बनला. सातारकर धावू लागले, पळू लागले मग त्यात कोणी वृद्ध असतील कोणी महिला असतील, कोणी  लहानगे असतील. त्यामध्ये कोणाची ऍजिओप्लास्टि झालेले असतील असे सर्वच सातारकरांना हक्काची हाफ हिल मॅरेथॉन वाटते. डॉ. संदीप काटे यांनी लिहिलेल्या म मॅरेथॉनचा हे पुस्तक नुकतेच वाचकांसाठी उपलब्ध झाले आहे. या पुस्तकाबाबत माहिती देताना डॉ. संदीप काटे म्हणाले, हे चारशे पानाचे पुस्तक आहे. दि.24 रोजी हे पुस्तक साताऱयात हे आले आहे. कोरोनाचा काळ संपून आपण 2021मध्ये चाललो आहे. पॉझिटीव्हीटी आहे. खूप छान मुहूर्तांवर पुस्तक आले आहे. 2021 मध्ये नवीन सुरुवात आपण करु या. पुस्तकाच्या पहिल्या कव्हरवर सातारा हिल मॅरेथॉनच चित्र आहे. त्यानंतर अर्पण पत्रिका आहे. पुस्तकाची खासीयत म्हणजे चित्र आहेत. मॅरेथॉनसंबंधित माहिती देणारी ही व्यंगचित्रे अमितकुमार यांनी काढले आहेत. त्यामुळे पुस्तकाला एक वेगळाच जीवंतपणा आला आहे. या पुस्तकात क पासून ज्ञ पर्यंत सर्व मुळाक्षरांनुसार एक पाठ आहे. द दुखणे, च चालणे, ट टेम्पो रन असे पाठ आहेत. रनिंगबद्दलची माहिती देणारे क्यु आर कोड पुस्तकात आहेत. तन्वी यांचेही या पुस्तकात आर्ट आहे. तसेच महाराष्ट्रातील धावदुतांची यादीही पुस्तकात आहे. धावण्यासाठी प्रोत्साहन करतात. मदत करतात, अशा 26 जिह्यातील 96 धावदुतांची यादी आहे. माझी सगळी क्रिएटीव्हीटी सातारा हाफ हिल मॅरेथॉन, सातारा रनर्स फौंडेशनची टीम, सगळय़ा मित्रांच्यामुळे हे पुस्तक आले आहे. पळत रहायच, धावत रहायच हे पुस्तक वाचत रहायच.रनिंगचा प्रवास खुप छान होईल याची मला खात्री आहे. लवकरच हे पुस्तक तुमच्या भेटीला येईल.

Related Stories

आघाडीचाही विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला!

datta jadhav

Kolhapur; दूरशिक्षणच्या पदवी प्रथम वर्षाला युजीसीकडून मान्यता

Abhijeet Khandekar

MPSC ची उद्या संयुक्त पूर्व परीक्षा

datta jadhav

अवकाळी पावसाचा चांगलाच धुमाकुळ

Patil_p

महाराष्ट्रात मागील 24 तासात 6 हजारपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

Tousif Mujawar

सातारा : वानराचा जीव वाचवण्यात यश

Archana Banage
error: Content is protected !!