Tarun Bharat

यंत्रमाग कामगाराचा मुलगा झाला ‘एअर फोर्स’ मध्ये गरुड कमांडो


प्रतिनिधी / कुरुंदवाड

कुरुंदवाडसारख्या निमशहरी गावात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या सौरभ माळी याची एअर फोर्सच्या गरुड पदासाठी निवड झाली आहे.

त्याचे वडील संजय माळी हे यंत्रमाग कामगार आहेत त्यांचा सौरभ हा मुलगा लहानपणापासून शिक्षणात हुशार होता लहानपणापासून त्याची एयर फोर्समध्ये जाण्याची महत्वकांक्षा होती. आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुणे (भोसरी) जुलै 2019मध्ये ‘एअर फोर्स’ ची परिक्षा दिली. त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये त्याने घवघवीत यश संपादन केल्याने त्याची एअर फोर्सच्या गरुड कमांडो पदासाठी निवड करण्यात आली आहे. त्याच्या निवडीचे प्रशिक्षण बेळगाव येथे होणार आहे.

सीताबाई पटवर्धन हायस्कूलचा तो माजी विद्यार्थी असून सध्या येथील एस. के.पाटील महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत आहे.

Related Stories

गडहिंग्लज शहराची दोन दिवस होणार नाकाबंदी

Archana Banage

‘स्वाभिमानी’चे 4 मार्चला महाराष्ट्रभर चक्काजाम

Abhijeet Khandekar

उद्रेक झाल्यास राज्यकर्तेच जबाबदार

Patil_p

कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला न्याय द्यावा

Archana Banage

सोलापूर शहरात 48 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, दोघांचा मृत्यू

Archana Banage

राज्यपालांचा राष्ट्रवादीकडून जोरदार निषेध

Patil_p