Tarun Bharat

यंदाचा सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताह ‘कोरोना योद्धयांना’ समर्पित

ऑनलाईन टीम / पुणे :

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे आयोजन दरवर्षी केले जाते. यंदा सप्ताहाचे 16 वे वर्ष असून कोरोनाच्या वैश्विक महामारीचे संकट संपूर्ण जगात ओढावल्याने याकाळात मोठे कार्य करणाऱ्या कोरोना योद्धयांना यंदाचा सप्ताह समर्पित करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली. 


दरवर्षी दिनांक 2 ते 9 डिसेंबर दरम्यान हा सप्ताह आयोजित केला जातो. यावर्षी कोरोना काळात सेवाकार्य केलेल्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान, रुग्णालयांमध्ये काम केलेल्या डॉक्टर्स व परिचारिकांचा गौरव, कोरोना रुग्णांचे मृत्यु झाल्यास त्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणा-यांचा सत्कार अशा कार्यक्रमांसह आरोग्य तपासणी शिबीर, रक्तदान शिबीर, आरोग्यविषयक जनजागृतीपर उपक्रम सप्ताहात राबविण्यात येणार आहेत. 


मोहन जोशी म्हणाले, मागील 15 वर्षे सलग देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सप्ताहातील कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. मात्र, यावर्षी हा सप्ताह मोठया प्रमाणात न करता सामाजिक भान राखून करण्यात येणार आहे. कोरोना योद्धे म्हणून समाजातील अनेकांनी अहोरात्र काम केले आहे. त्यांच्या कार्याला सलाम करण्यासोबतच यापुढील काळात आरोग्याविषयी काय काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शनपर उपक्रम करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. 

Related Stories

कशी होते राष्ट्रपतींची निवड? कोण लढवू शकतं ही निवडणूक…

datta jadhav

पुणे : नंदेश उमप, सुबोध भावे यांचा शुक्रवारी सन्मान

Tousif Mujawar

उष्णतेची लाट…मान्सून सुसाट…

Patil_p

आरोग्य सेवा हक्काचे राजस्थान मॉडेल

Patil_p

सीबीएसईची एबीसीडी

Patil_p

पुणे : कोरोनामुक्त भारतासाठी दगडूशेठ दत्तमंदिरात ‘धन्वंतरी यज्ञ’

Tousif Mujawar
error: Content is protected !!