Tarun Bharat

यंदाच्या अधिवेशनातच गोहत्या बंदी विधेयक मांडणार

मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची माहितीमुख्यमंत्री येडियुराप्पा यांची माहिती

प्रतिनिधी/ बेंगळूर

यंदाच्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात गोहत्या बंदी विधेयक मांडण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी दिली आहे. याच दरम्यान पशुसंगोपन मंत्री प्रभू चौहान यांनी देखील उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशाच्या धर्तीवर गोहत्या बंदी कायदा जारी करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. काँग्रेसने या दुरुस्ती विधेयकाला विरोध व्यक्त केला आहे.

शिमोगा जिल्हय़ातील सागर येथे पत्रकारांशी बोलताना येडियुराप्पा म्हणाले, यापुर्वी गोहत्या बंदी कायदा जारी करण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची संमती मिळवून मंजुरीसाठी राज्यपालकांकडे पाठवून देण्यात आले होते. मात्र, राज्यपालांनी ते फेटाळले होते. यावेळच्या अधिवेशनात पुन्हा गोहत्या बंदी दुरुस्ती विधेयक मेंडण्यात येईल. या विधेयकाला राज्यपालांचीही मंजुरी मिळण्याचा विश्वास आपल्याला आहे. त्याचप्रमाणे पुढील अधिवेशनात ‘लव्ह जिहाद विरोधी विधेयक’ मांडण्यात येईल. हे विधेयक यावेळीच्या अधिवेशनात मांडले जाणार नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

8 डिसेंबर रोजी शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकार नेहमीच शेतकऱयांच्या बाजूने आहेत. त्यामुळे भारत बंद सारखा कटू निर्णय घेणे योग्य नाही. यामुळे जनतेचे मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकऱयांनी सरकारसोबत बसून चर्चेद्वारे समस्येवर तोडगा काढावा, असे आवाहनही त्यांनी केले.

बेंगळूरच्या विधानसौध येथे पत्रकारांशी बोलताना पशूसंगोपनमंत्री प्रभू चौहान म्हणाले, यंदाच्या अधिवेशनातच गोहत्या बंदी विधेयक मांडण्यात येणार आहे. यासाठी आपण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आहे. त्या राज्यात या कायद्याची कोणत्या पद्धतीने अंमलबजावणी केली आहे, याची माहिती घेतली आहे. गुजरात आणि राजस्थानमधील गोहत्या बंदी कायद्याची माहितीही आपण घेतली आहे.

Related Stories

थावरचंद गेहलोत राज्याचे नवे राज्यपाल

Amit Kulkarni

राज्यातील पावसामुळे खराब झालेले रस्ते दुरुस्त करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Archana Banage

कर्नाटक सीईटी परीक्षा २८,२९ ऑगस्टला

Archana Banage

बेंगळूरमध्ये भारतातील सर्वात मोठे कोविड केअर सेंटर सुरू

Archana Banage

कर्नाटक: भद्रा व्याघ्र प्रकल्पात आढळला वाघिणीचा मृतदेह

Archana Banage

बेंगळूर: बीबीएमपीने २९७ बेकायदेशीर होर्डिंग्ज हटविली

Archana Banage