Tarun Bharat

यंदाच्या गणेशोत्सवावर तिसऱया लाटेचे सावट

सार्वजनिक श्रीमूर्ती यावषीही मंदिरात, डॉल्बी-फटाक्मयांना फाटा देत उत्सव साजरा करा, श्रीमूर्तींच्या उंचीबद्दलही सूचना

प्रतिनिधी /बेळगाव

कोरोना महामारीच्या संकटामुळे गेल्या वषीप्रमाणे यंदाही सार्वजनिक श्रीमूर्तींची स्थापना मंडपाऐवजी मंदिरातच होणार आहे. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी शुक्रवारी रात्री यासंबंधी आदेश काढला असून कोरोना व डेल्टा प्लसचा फैलाव थोपविण्यासाठी सार्वजनिक श्रीमूर्तींची प्रतिष्ठापना आपापल्या परिसरातील मंदिरात करण्याचे आवाहन केले आहे. श्रीमूर्तींच्या उंचीबद्दलही आपल्या आदेशात जिल्हाधिकाऱयांनी खुलासा केला आहे.

गणेशोत्सव मंडळांनी जिल्हाधिकाऱयांची भेट घेऊन गणेशोत्सवासंबंधी लवकरात लवकर निर्णय जाहीर करा, अशी मागणी केली होती. यासाठी सातत्याने पाठपुरावाही सुरू होता. शुक्रवारी रात्री जिल्हाधिकाऱयांनी आदेश जारी केला असून सार्वजनिक गणेशोत्सव कसा असावा? घरगुती गणेशोत्सव कसा साजरा करावा? याविषयीही मार्गसूची जारी केली आहे.

राज्याच्या मुख्य सचिव व आपत्ती निवारण समितीच्या अध्यक्षांनी 18 जुलै 2021 रोजी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱयांनी केले असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या या आदेशामुळे यंदाचा गणेशोत्सवही साधेपणाने साजरा करावा लागणार आहे.

10 सप्टेंबर 2021 पासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. कोरोना व डेल्टा प्लसचा फैलाव शेजारच्या महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. 29 जुलै 2021 रोजी जिल्हय़ात 567 सक्रिय रुग्ण होते. खासकरून बेळगाव व महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या चिकोडी तालुक्मयात दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. तिसरी लाट थोपविण्यासाठी राज्य सरकारने मार्गसूची जाहीर केली आहे.

मार्गसूचीचे पालन करा

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक श्रीमूर्तींची वर्दळीच्या ठिकाणी प्रतिष्ठापना न करता आपल्याजवळच्या मंदिरात प्रतिष्ठापना करावी, असा आदेश जारी केला आहे. भक्तीमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करावा. मात्र, गणेशोत्सव मंडळे व गणेशभक्तांनी प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या मार्गसूचीचे पालन करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱयांनी केले आहे.

मूर्तीच्या उंचीसंबंधीही खुलासा

डॉल्बी, फटाक्मयांना फाटा देण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱयांनी केले असून मूर्तीच्या उंचीसंबंधीही आदेशात खुलासा केला आहे. घरगुती श्रीमूर्तीची उंची आसनासहीत दोन फूट व सार्वजनिक श्रीमूर्तीची उंची आसनासहीत 4 फुटाइतकी असावी. श्रीमूर्ती बनविण्यासाठी पीओपीचा वापर करू नये. मातीच्या श्रीमूर्तीची प्रतिष्ठापना करावी, असे आवाहनही जिल्हाधिकाऱयांनी केले आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे गेल्या वर्षीही अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता. पुणे, मुंबईनंतर बेळगाव येथील गणेशोत्सव थाटामाटात साजरा केला जातो. श्री विसर्जन मिरवणुकीत तर लाखो गणेशभक्तांचा सहभाग असतो. मात्र, गेल्या वषी कोरोनामुळे श्रींचे आगमन व विसर्जन जल्लोषाविना झाले होते. कोरोनाची तिसरी लाट येणार, अशी शक्मयता तज्ञांनी व्यक्त केल्यामुळे यंदाचा गणेशोत्सवही जल्लोषाविनाच साजरा करावा लागणार आहे.

गणेशोत्सवासाठीची मार्गसूची

1. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व देवस्थान मंडळांनी पोलीस, महानगरपालिका, हेस्कॉम, आरोग्य, अग्निशमन दल, प्रदूषण नियंत्रण मंडळ व इतर संबंधित खात्यांची परवानगी घेणे सक्तीचे.

2. कोविड-19 चा फैलाव वाढतो आहे. त्यामुळे प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱया सूचनांचे पालन करावे. मायक्रो कंटेन्मेंट झोनबाहेर असणाऱया मंदिरातच श्रीमूर्तीची स्थापना करावी. डॉल्बी, फटाक्मयांचा वापर न करता साधेपणाने व भक्तीभावाने गणेशोत्सव साजरा करावा.

3. घरगुती श्रीमूर्तीची उंची आसनासहित 2 फूट व मंदिरात प्रतिष्ठापना केल्या जाणाऱया सार्वजनिक श्रीमूर्तीची आसनासहित 4 फुटाची मर्यादा ओलांडू नये. पीओपीला फाटा देऊन मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी.

4. घरगुती श्रीमूर्तींचे विसर्जन आपापल्या घराच्या आवारातच करता येईल, याची व्यवस्था करावी. जर ते शक्मय झाले नाही तर महानगरपालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मोबाईल टँकमध्ये मूर्तींचे विसर्जन करावे.

5. गणेशोत्सवात मंदिर परिसरात जाहिरात फलकांमुळे गर्दी होऊ नये, याची काळजी घ्यावी. कोविड-19 बद्दल जनजागृती करणारे, सामाजिक व आरोग्य संदेश देणाऱया जाहिरातींना प्राधान्य द्यावे.

6. सांस्कृतिक, मनोरंजन कार्यक्रमांबरोबरच भजन, कीर्तन, व इतर धार्मिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. कोरोना, मलेरिया, डेंग्यू थोपविण्यासाठी प्राधान्य द्यावे. स्वच्छतेविषयी जनजागृती करण्याबरोबरच ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी सरकारी नियमांचे पालन करणे.

7. गणेशोत्सवाच्या काळात आरतीसाठी केवळ पाच जणांना परवानगी आहे.

8. नागरिकांसाठी केबल नेटवर्क, वेबसाईट, फेसबुकसह सोशल मीडियावर श्रींचे दर्शन करण्यासाठी व्यवस्था करावी.

9. ज्या मंदिरात श्रीमूर्तींची स्थापना करणार आहे, त्या मंदिरात सातत्याने सॅनिटायझर व थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करावी. दर्शनासाठी येणाऱया भाविकांमध्ये किमान 6 फुटाचे अंतर राहील, यासाठी मार्किंग करावे व त्याचे पालन करावे. प्रत्येक जण मास्कचा वापर करतील, यासाठी दक्षता घ्यावी. गणेशोत्सव मंडळाचे सदस्य, पुजारी आदींनी लस घेतलेली असावी.

10. श्रींच्या आगमनावेळी किंवा श्री विसर्जनावेळी मिरवणूक काढू नये. आरती व इतर धार्मिक विधी मंदिरात व आपापल्या घरातच पूर्ण करावेत. श्री विसर्जनाच्या ठिकाणी जास्त वेळ कोणी थांबू नये. लहान मुले, गर्भवती महिला, ज्येष्ट नागरिक, आजाराने त्रस्त असणाऱयांनी जाऊ नये, यासाठी दक्षता घ्यावी. मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात येणाऱया श्रीमूर्तींचे विसर्जन एकत्र न करता पोलीस खाते ठरवून देतील त्या मार्गाने, त्यावेळी करावेत.

11. श्री विसर्जनावेळी पोलीस दल ठरवून देतील त्याच मार्गाने विसर्जन तलावापर्यंत यावे. महानगरपालिकेचे विसर्जन तलाव किंवा मोबाईल टँकमध्ये श्री विसर्जन करावे.

12. कोरोनाचा फैलाव थोपविण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस, मनपा, आरोग्य, प्रदूषण नियंत्रण मंडळ, अग्निशमन दल व इतर सरकारी खात्यांकडून दिल्या जाणाऱया सूचनांचे व नियमांचे सक्तीने पालन करावे.

Related Stories

काहेरतर्फे महात्मा गांधी अध्ययन केंद्राचा शुधारंभ

Patil_p

अनिल बेनके चषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

Amit Kulkarni

समादेवी उत्सवांतर्गत पालखी प्रदक्षिणा उत्साहात

Patil_p

शाळकरी मुलीचे अपहरण

Patil_p

टिप्परची धडक बसून 54 बकऱ्या ठार

Tousif Mujawar

लक्ष्मण सवदी यांच्या घोषणेमुळे खानापूर तालुका भाजपात खळबळ

Amit Kulkarni