Tarun Bharat

यंदाच्या पावसाळ्यात राहती घरे समुद्र गिळंकृत करण्याची भीती

पांढरा समुद्र-मिऱया धूपप्रतिबंधक बंधाऱयाचा दुरुस्ती प्रश्न गंभीर ,पावसाळयापूर्वी तातडीने दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी,बंधारा दुरुस्तीची केवळ आश्वासने

प्रतिनिधी / रत्नागिरी

प्रशासनाने पावसाळ्य़ापूर्वीतरी मिऱया बंधारा तात्पुरता स्वरुपात दुरुस्त करावी अन्यथा येत्या पावसाळ्य़ात राहती घरे समुद्राच्या लाटा गिळंकृत करण्याची भीती भाटीमिऱया पाटीलवाडी येथील ग्रामस्थांनी व्यक्त केल़ी

  दरवर्षी मिऱया येथे समुद्राचे पाणी ग्रामस्थांच्या घरापर्यंत येत आह़े समुद्राच्या लाटांमुळे येथील ग्रामस्थांचे अतोनात नुकसान होत आह़े  शिवाय पावसाळ्य़ामध्ये  ग्रामस्थांना भीतीच्या छायेखाली रहावे लागत आह़े स्थानिक आमदार, जिल्हाधिकारी केवळ घोषणा करत आहेत. प्रत्यक्षामध्ये काम करण्यासाठी निधी नसल्याचे धूपप्रतिबंधक बंधाऱयाचे काम रखडल्याची माहिती रहिवाशांनी दिल़ी समुद्राच्या लाटामुळे ग्रामस्थांची नारळाची झाडे, ग्रामस्थांची कपांऊड †िभंत, तसेच शौचालये वाहून गेली आहेत़ तर पिण्याच्या पाण्याच्या विहिरींचे पाणी खारट झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिल़ी

 पत्तन विभागाकडून मुरुगवाडा पांढरा समुद्र ते मिऱया या ठिकाणची 6 ठिकाणे संवेदनशील असल्याचे निश्चित करुन या 6 ठिकाणचा धूपप्रतिबंधक बंधारा तातडीने दुरुस्तीसाठी 98 लाखांच्या निधीची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवण्यात आल़े मात्र त्यानंतर आलेल्या निसर्ग चक्रीवादळ, अमावस्या व पौर्णिमेच्या उधाणामुळे प्रस्तावित केलेल्या जागेची मोठय़ा प्रमाणात धूप झाल़ी त्यामुळे बंधारा दुरूस्तीसाठी 98 लाखाऐवजी 1 कोटी 14 लाखाची आवश्यकता आहे. पालकमंत्र्यांनी सुधारित रकमेचे अंदाजपत्रक करण्याच्या सूचना केल्या होत्य़ा त्यानुसार नव्या रकमेचे अंदाजपत्रक पत्तन विभागाने 20 ऑक्टोबर 2020 रोजी जिल्हाधिकाऱयांना सादर केले.

निधीमुळे कामे खोळंबताहेत

नेहमीच्या पावसाळ्य़ात ग्रामस्थांना समुद्राच्या लाटांचा सामना करावा लागत आह़े तर शासन प्रशासनाकडून केवळ आश्वासनापलीकडे काही होत नसल्यामुळे ग्रामस्थ हतबल झाले आहेत़ खासदार, आमदार तसेच तालुक्यासह जिल्हय़ात सेनेचे निर्विवाद सत्ता असताना निधीमुळे कामे खोळंबत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आह़े

Related Stories

बडय़ा धेंडाची वसूली होणार सक्तीने

Patil_p

अजित पवार यांची परमबीर सिंग लेटरबॉम्ब प्रकरणी सीबीआय चौकशी करावी ; भाजपची मागणी

Archana Banage

धोकादायक ठिकाणच्या कुटुंबांची स्थलांतर प्रक्रिया सुरू

Patil_p

परखंदळे: पंचवीस वर्षातील रेशन भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी

Archana Banage

शरद पवारांच्या बैठकीला सेनेला निमंत्रण नाही, संजय राऊत म्हणाले…

Tousif Mujawar

कोरोना मदत कार्यास नागरीकांनी सहकार्य करावे – मुख्याधिकारी काटकर यांचे आवाहन

Patil_p