Tarun Bharat

यंदाही झिम्मा फुगडीचा खेळ रंगला नाही

Advertisements

नागपंचमीचा सण साधेपणाने साजरा

वार्ताहर/ कराड

सोमवारपासून श्रावण महिन्यास प्रारंभ झाल्यानंतर शुक्रवारी नागपंचमीचा सण साजरा करण्यात आला. कोरोनामुळे अद्याप यात्रा-जत्रा व सार्वजनिक उत्सवांना परवानगी नसल्याने नागपंचमीचा सणही अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. दरवर्षी नागपंचमचीच्या दिवशी शिवाजी हायस्कूलच्या मैदानात रंगणारा महिलांचा झिम्मा फुगडीचा खेळ सलग दुसऱया वर्षीही रद्द करण्यात आला. मोजक्या महिलांनी नागोबाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घालून लाहय़ांचा नैवेद्य अर्पण केला. घरोघरी मात्र नागोबाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.

  दरवर्षी नागपंचमीच्या निमित्ताने मंगळवार पेठ व शिवाजी हायस्कूल समोरील नागोबाच्या मंदिरात पूजेसाठी महिलांची गर्दी होत असते. तर शिवाजी हायस्कूलच्या मैदानात महिलांचा झिम्मा फुगडीचा खेळ रंगतो. तर शिवाजी हौसिंग सोसायटी परिसराला नागपंचमीच्या दिवशी यात्रेचे स्वरूप येते. मात्र दीड वर्षपासून कोरोना संकट सुरू झाल्याने गेल्यावर्षीही नागपंचमीचा सण घरगुती पद्धतीने साजरा करण्यात आला होता. तर याही वर्षी नागपंचमीचा सण अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.

   शिवाजी हायस्कूल समोरील नाग मंदिरात तुरळक प्रमाणात महिला दर्शनासाठी येत होत्या. महिलांची गर्दी होऊ नये, यासाठी बॅरिगेट लावून उपाययोजना करण्यात आली होती. नागेबाच्या मूर्तीला दूध व लाहय़ा अर्पण करून नागोबाची पूजा करण्यात आली.

Related Stories

जिल्ह्यातील 379 गावे बाधित; 1324 कुटुंबांचे स्थलांतर

datta jadhav

कास धरणाचे काम 11 पासून बंद पाडणार

Patil_p

पेढा भरवून पुष्पगुच्छ देणारे राज्यपाल मी पहिल्यांदाच पाहिले

datta jadhav

नाना पटोलेंचा उत्तर महाराष्ट्र दौरा पुन्हा रद्द

Abhijeet Shinde

थॅलेसिमिया रूग्णाला रक्त देण्यास नकार

datta jadhav

BJP Maharashtra: भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष ठरले; ‘या’ नेत्यांची लागली वर्णी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!