Tarun Bharat

यंदाही दहावीचा निकाल श्रेणीनिहाय

Advertisements

14 जूनपासून एसएसएलसी परीक्षा : प्रत्येक विद्यार्थ्यांला परीक्षेसाठी पात्र ठरवत अर्ज भरण्याच्या सूचना

प्रतिनिधी / बेळगाव

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना दहावीचे वर्ग नियमित झाले आहेत. सध्या शाळा स्तरावर दहावी परीक्षेचे अर्ज भरण्यात येत असून 14 जून ते 25 जून दरम्यान एसएसएलसी परीक्षा पार पडणार आहे. मात्र दरवर्षी गुणामध्ये मिळणारा विद्यार्थ्यांचा निकाल श्रेणी स्वरुपात उपलब्ध होणार आहे. गतवर्षीपासून श्रेणीनिहाय निकाल जाहीर करण्यात येत असून याबाबतची माहिती जाहीर करण्यात आली आहे.

दरवर्षी दहावीची परीक्षा मार्च एप्रिल महिन्यात होते. मात्र गतवर्षी कोरोनामुळे जून महिन्यात तर यावर्षी देखील जून महिन्यात परीक्षा होणार आहे. 625 गुणांचीच परीक्षा होणार आहे. दहावीचे वर्ष विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे असून संख्यात्मक निकालाबरोबरच गुणात्मक स्वरुपात निकाल समजावा यासाठी ए प्लस ते सी पर्यंतचे श्रेणीनिहाय निकाल देण्यात येणार आहेत. यामुळे निकाल आता श्रेणी स्वरुपात पहायला मिळणार आहे.

त्यानुसार ए प्लस 563 ते 625, ए श्रेणी 500 ते 562, बी प्लस 438 ते 499, बी 335 ते 437, सी प्लस 313 ते 374 अशी श्रेणीनिहाय विभागणी करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा विषयनिहाय गुण अंतिम श्रेणीत महत्त्वाचे ठरणार आहेत. विद्यार्थ्यांच्या एकूण गुणांवरच श्रेणी ठरणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांसाठी एक एक गुण महत्त्वाचा आहे. गतवर्षी प्रथमच श्रेणीनिहाय निकाल जाहीर झाला असून यामुळे अनेक शाळांची टक्केवारी घसरली आहे. मात्र यावर्षी निकाल वाढीकडे विशेष लक्ष देण्यात यावे अशा सूचना शिक्षण विभागातर्फे करण्यात आल्या आहेत.

अर्ज भरण्याची लगबग

शाळा स्तरावर 1 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान दहावीचे ऑनलाईन अर्ज भरण्यात येत आहेत. यामुळे सर्व माहिती उपलब्ध करुन घेत शाळांकडून प्रत्येक विद्यार्थ्यांचे अर्ज भरले जात आहेत. दरवर्षी विद्यार्थ्यांची उपस्थिती तपासून परीक्षेला अर्ज भरला जात होता. मात्र यावर्षी सरसकट दहावीतील प्रत्येक विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र ठरवत अर्ज भरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यामुळे खऱया अर्थाने दहावीचे विद्यार्थी परीक्षेसाठी सज्ज झाले आहेत.

Related Stories

अतिथी प्राध्यापकांना सेवा सुरक्षेबरोबर नोकरीत कायम करा

Amit Kulkarni

राष्ट्रीय विज्ञान अकादमी स्पर्धेत बेळगावच्या युवकांची बाजी

Amit Kulkarni

बुडाची बैठक पुन्हा रद्द

Amit Kulkarni

राज्यपालांच्या ताफ्यासाठी 15 मिनिटे वाहतूक रोखली

Amit Kulkarni

तुरमुरी-बाची गावच्या महिलांची ता. पं.ला धडक

Amit Kulkarni

नव्वदीचे दशक अन् महिला खो-खोमध्ये यशाचे शिखर

Amit Kulkarni
error: Content is protected !!