Tarun Bharat

यंदाही हज यात्रेला मुकणार भारतीय मुस्लिम

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

जुलै महिन्यात सुरू होणाऱ्या हज यात्रेवर यंदाही कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे सौदी अरबियाने भारतासह इतर देशांच्या यात्रेला परवानगी नाकारली आहे. सौदी अरेबियातील केवळ 60 हजार मुस्लिम लोकांना या यात्रेसाठी परवानगी देण्यात आली आहे.

सौदी प्रेस एजन्सीनुसार, यावर्षी हज यात्रेसाठी देशातील 60 हजार मुस्लिम नागरिकांनाच परवानगी देण्यात आली आहे. यासाठी काही अटीही घालण्यात आल्या आहेत. हज यात्रेला जाऊ इच्छिणाऱ्यांचे वय 18 ते 65 असावे. या लोकांनी लस घेतलेली असावी. तसेच ते आजारी नसावेत.

हज यात्रेसाठी दरवर्षी जवळपास 20 लाख यात्री जात असतात. कोरोना संकटामुळे मागील वर्षी केवळ 1 हजार लोकांना हज यात्रेसाठी परवानगी देण्यात आली होती.

Related Stories

मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणासह अनेक मुद्द्यांवर चर्चा, पंतप्रधानांकडून सकारात्मक निर्णयाची आशा : मुख्यमंत्री

Archana Banage

इम्रान खानविरोधी अटक वॉरंट रद्द

Patil_p

आपत्ती नियंत्रण निधीतील 50 टक्के रक्कम वापरा

Omkar B

बल्लारपूर रेल्वे स्थानकातील पूल दुर्घटनेतील मृताच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर

Archana Banage

फळव्यापाऱ्याची मुचंडी वनविभागात झाडाला गळफासने आत्महत्या

Abhijeet Khandekar

दहावी-बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाईनच

Archana Banage