Tarun Bharat

यंदा आंचिममध्ये ओपन एअर स्क्रीनिंग चित्रपटांची पर्वणी

Advertisements

20 ते 28 नोव्हेंबरपर्यंत हायब्रीडपद्धतीने आयोजन : ऑफलाईन पद्धतीने आयोजित करण्याचा विचार

प्रज्ञा मणेरीकर /पणजी

भारतातील सर्वात मोठा महोत्सव मानला जाणारा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या 20 ते 28 नोव्हेंबरपर्यंत हायब्रीड पद्धतीने गोव्यात आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी विविध स्तरावर काम सुरू करण्यात आले आहे. तसेच यंदा आर्ट पार्क तसेच काही चित्रपटांचे ओपन एअर स्क्रीनिंगही करण्यात येण्याची शक्यता आयोजकांतर्फे वर्तविली जात आहे. त्यामुळे यंदा हायब्रीड असला तरी कोरोनाची स्थिती पाहून ऑफलाईन पद्धतीने महोत्सव आयोजित करण्याचा विचार केला जात आहे.

यंत्रणा, कामगार कार्यरत

20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोव्यात आंचिम आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी यंत्रणा तसेच कामगार कार्यरत आहेत. विविध उपक्रमासाठी गोवा मनोरंजन सोसायटीकडून निविदा जारी करण्यात आल्या आहेत. तसेच दरवर्षीप्रमाणे सर्वांसाठी आकर्षक ठरणारे आर्ट पार्कचा यंदा महोत्सवात समावेश करण्याचा विचार केला जात आहे. त्याविषयी निविदाही जारी करण्यात आली आहे. याचबरोबर सामान्य लोकांसाठी, पर्यटकांसाठी महोत्सवातील काही चित्रपट पाहता यावेत यासाठी ओपन एअर स्क्रीनिंग करण्याचाही विचार तज्ञांकडून केला जात आहे. त्यासाठी निविदा जारी करण्यात आल्या आहेत. परंतु याविषयी कोरोनाच्या स्थिती पाहून शेवटच्या क्षणी निर्णय घेण्यात येईल. सध्या महोत्सव हायब्रीड पद्धतीने आयोजित करण्याच्यादृष्टीने सर्व तयारी केली जात असल्याची माहिती गोवा मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी दिली.

आतापर्यंत 1280 प्रतिनिधींची नोंदणी

मागील महिन्यापासून आंचिमसाठी प्रतिनिधी नोंदणीला सुरुवात झाली असून नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. आतापर्यंत महोत्सवासाठी 1280 प्रतिनिधींची नोंदणी झाली असून पुढील महिन्यापर्यंत ही नोंदणी 6000 पार होईल अशी माहिती फळदेसाई यांनी दिली.

 यंदाच्या आंचिममधील विविध विभागातून जगभरातील चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. महोत्सव कॅलिडोस्कोप, आंतरराष्ट्रीय पदार्पण, आयसीएफटी स्पर्धा विभाग, कंट्री फोकस, श्रद्धांजली, मास्टरक्लास, इतर उपक्रम असतील. तसेच आंचिमच्या 52व्या आवृत्तीत 300हून जास्त चित्रपटांचे स्क्रीनिंग करण्यात येणार आहे.

यंदापासून ‘सत्यजित रे’ जीवनगौरव पुरस्कार

यंदाचे वर्ष हे प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित रे यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून पाळण्यात येत आहे. त्यानिमित्त त्यांच्या चित्रपटांद्वारे त्यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. तसेच यंदापासून सत्यजित रे यांच्या स्मृत्यर्थ ‘एक्सलन्स इन सिनेमा’ हा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.

 माध्यम प्रतिनिधी नोंदणीला सुरूवात

गोव्यात 20- 28 नोव्हेंबर दरम्यान होणाऱया 52व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी माध्यम प्रतिनिधी नोंदणीला कालपासून सुरू झाली आहे. पीआयबी मार्गदर्शक तत्त्वांनुसार माध्यमांना मान्यता देण्यात येईल. अर्जदार 21 वर्षावरील असावा तसेच इफ्फी कव्हर करण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभवही असावा. लवकरच ऑनलाईन व्यासपीठावरील नोंदणी जाहीर करण्यात येईल. इच्छुकांनी 14 नोव्हेंबरपूर्वी नोंदणी करावी असे कळविण्यात आले आहे.

  सध्याची कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता, 52 वा इफ्फी हायब्रीड स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे. जगभरातील सर्वोत्कृष्ट समकालीन आणि अभिजात चित्रपटांचा व्यापक आणि विविधांगी पट आंचिममध्ये मांडला जातो. जगप्रसिद्ध चित्रपट निर्माते, अभिनेते, तंत्रज्ञ, समीक्षक, शिक्षणतज्ञ आणि चित्रपट रसिकांचे महोत्सवात स्वागत केले जाते. चित्रपटांचे सादरीकरण, वर्ग, परिचर्चा, सहनिर्मिती, परिसंवाद इत्यादींच्या माध्यमातून हा चित्रपट आणि कलेचा सोहळा साजरा केला जातो. 52 व्या इफ्फीमधे सहभागी होऊ इच्छिणारे माध्यम प्रतिनिधी पुढील दुव्यावर अर्थात लिंकवर ऑनलाइन नोंदणी करू शकतात.

<https://my.iffigoa.org/extranet/media/> लिंकमधे नमूद केलेल्या पत्र सूचना कार्यालयाच्या (पीआयबी) मार्गदर्शक सूचनांनुसार माध्यमांना प्रवेशासाठी मंजूरी दिली जाईल. अर्जदारांचे वय 1 जानेवारी, 2021 रोजी 21 वर्षांपेक्षा जास्त असावे आणि त्यांना इफ्फीसारख्या मोठय़ा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांच्या बातमीदारीचा किमान तीन वर्षांचा व्यावसायिक अनुभव असावा. याशिवाय अर्जदाराने कोविड-19 प्रतिबंधक लस घेतलेली असावी अशी शिफारस आहे.   लसीची एक किंवा दोन्ही मात्रा घेतलेले प्रतिनिधी नोंदणी पोर्टलवर त्यांचे लसीकरण प्रमाणपत्र अपलोड करू शकतात. दि. 14 नोव्हेंबर 2021 च्या मध्यरात्री नोंदणी प्रक्रिया बंद होईल.

ऑनलाइन सहभागाच्या संधी

यावषी जानेवारीत झालेल्या 51 व्या इफ्फीप्रमाणेच, 52 व्या महोत्सवातही   संबंधित उपक्रमांना आभासी माध्यमातून उपस्थित राहण्याची संधी उपलब्ध केली जाणार आहे. अनेक चित्रपट ऑनलाइन प्रदर्शित केले जाणार आहेत. इफ्फी संदर्भात पत्र सूचना कार्यालयाद्वारे (पीआयबी) आयोजित सर्व पत्रकार परिषदा पीआयबीच्या युटय़ूब वाहिनी youtube.com/pibindia <http://youtube.com/pibindia> वर थेट-प्रसारित होतील. पत्रकारांना इथे ऑनलाईन प्रश्न विचारण्याची सुविधा असेल. आभासी व्यासपीठासाठीची नोंदणी प्रक्रीया लवकरच जाहीर केली जाईल.

Related Stories

पणजीत वाहतूक कोंडी वाढली !

Amit Kulkarni

कुडचडेतील कचरा प्रकल्पासंबंधी दिलेली माहिती विसंगत : होडारकर

Amit Kulkarni

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विहिंपचा श्रीरामनाम जप

Amit Kulkarni

म्हापसा पालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना संधी : जॉन लोबो

Amit Kulkarni

मुरगाव तालुक्याला जायकाचे पाणी पुरवण्याचे सा.बां.खा. मंत्र्यांचे आश्वासन

Patil_p

बेकायदा व्यवसाय कायदेशीर करण्याची मजल म्हणजे दारिद्रयाचे लक्षण

Patil_p
error: Content is protected !!