Tarun Bharat

यंदा उन्हाळ्यात तापमानात घट

Advertisements

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता तापमान वाढीला कारणीभूत ठरणारे घटक बंद ठेवले होते. परिणामी यंदाच्या उन्हाळ्यात सरासरी दोन ते तीन डिग्री सेल्सिअस तापमानात घट झाल्याचे आढळून आल्याचे तज्ञांचे मत आहे.

कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी कारखाने आणि कंपन्या तसेच दळणवळणावर मर्यादा घालण्यात आल्या. त्याचबरोबर औद्योगिक वसाहतींमधील अत्यावश्यक सेवा बजावणाऱया कंपन्या वगळता इतरांना बंद ठेवण्याच्या सक्त सूचना करण्यात आल्या आहेत. यामुळे हवेतील प्रदूषणात घट झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी तापमानातील वाढ रोखण्यात या गोष्टी कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात येत आहे. गत वर्षापासून कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच परिणाम एकूणच तापमान तसेच हवामानावर झाल्याचेही चित्र पाहावयास मिळत आहे.

गतवषी मे महिन्याच्या 25 तारखेस 45 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. परंतु तद्नंतर तापमान हळूहळू कमी होत गेले. तत्पूर्वी 2018 मधील दोन मे रोजी 43.7 तर 2019 मधील 21 मे रोजी 45 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद हवामान खात्याकडे झाली होती. यंदाच्या वषी 1 मे रोजी 41 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यानंतर आजपर्यंत तापमान 39 डिग्री सेल्सिअसच्यावर गेले नसल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

हवेतील प्रदूषणामुळे तापमानात वाढ होण्याची शक्मयता असते. दरम्यान कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अशा घटकांवर मर्यादा आणली गेली आहे. त्यामुळेच असहाय वाटणारा उन्हाळा सुसह्य झाल्याचे चित्र दिसत आहे. हवामानात बदल होऊन तापमानात घट झाल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर वादळ व दरम्यानच्या काळात पडलेला पाऊस यामुळेही तापमानात घट झाल्याची शक्मयता वर्तविण्यात येत आहे. वादळामुळे मान्सूनची दिशा बदलण्याची शक्मयता नसते मात्र वेळेत बदल होऊ शकतो असेही तज्ञांचे मत आहे. सध्या जरी तापमानात घट दिसून येत असली तरी येणाऱया दिवसात त्यात वाढ होण्याची शक्मयता असल्याचेही सांगण्यात येत आहे.

दळणवळण तसेच प्रदूषण करणाऱया घटकांवर मर्यादा घालण्यात आल्या. ज्या तापमानवाढीस कारणीभूत आहेत. यामुळे तापमान वाढीवर परिणाम होऊन तापमानात घट झाल्याचे दिसून येत आहे. -प्रा. विनायक धुळप, पर्यावरण विभाग, पुण्यश्लेक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर

Related Stories

शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेसाठी फडणवीस तयार : आठवले

Archana Banage

एकाच दिवशी दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

Archana Banage

पंकजा मुंडेंच्या उपोषणाबाबत संभ्रमावस्था

prashant_c

डॉ. के. के. सिजोरिया यांना जीवनगौरव सुश्रुत पुरस्कार जाहीर

prashant_c

कोरेगाव-भीमा चौकशी आयोगासोर येण्यास मिलिंद एकबोटेंचा नकार

prashant_c

बार्शीत पोलीस कर्मचाऱ्या सह पत्नीही कोरोना बाधित, रोजची हजेरी ऑनलाईन घ्यावी

Archana Banage
error: Content is protected !!