Tarun Bharat

यंदा फटाक्यांचा बाजार भरणार

भेदा चौकातील मैदानात 40 स्टॉल उभारण्याचे काम सुरू

वार्ताहर/ कराड

दरवर्षी दिवाळीला भेदा चौकातील पालिकेच्या मैदानात फटाका बाजार भरवण्यात येतो. गेल्यावर्षी लॉकडाऊनमुळे फटाक्यांचा बाजार रद्द करण्यात आला होता. यावर्षी मात्र लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्याने बाजारपेठा सुरू झाल्या असून फटाक्यांचा बाजारही भरणार आहे. त्यासाठी पालिकेच्या वतीने याठिकाणी 40 स्टॉलची आखणी पेली असून स्टॉल उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

भेदा चौकातील मैदानात दरवर्षी दिवाळीला फटाका बाजार भरवण्यात येतो. पालिकेच्या वतीने हे मैदान फटाका स्टॉलसाठी भाडेतत्वावर उपलब्द करून देण्यात येते. दरवर्षी या ठिकाणी 60 ते 65 स्टॉल उभारण्यात येतात. यावर्षी मात्र कोरोनाच्या नियमांमुळे प्रत्येक स्टॉलमध्ये पाच फूट अंतर ठेवणे आवश्यक असल्याने याठिकाणी केवळ 40 स्टॉलची आखणी करण्यात आली आहे. यातील 33 स्टॉलचे बुकींग झाले आहे.

 पालिकेच्या वतीने फटाका व्यावसायिकांना स्टॉलसाठी 8ƒ10 ची मोकळी जागा उपलब्द करून देते. यासाठी 5 हजार रूपये भाडे व 900 रूपये जीएसटी कर आकारण्यात येतो. व्यावसायिक स्वखर्चाने या ठिकाणी स्टॉलची उभारणी करतात. यावर्षी कोरोनाच्या नियमांचे पालक करावे लागत असल्याने संपूर्ण मैदानात केवळ 40 स्टॉलची आखणी केली आहे. नेहमीच्या तुलनेत यावर्षी 20 ते 25 स्टॉल कमी झाले आहेत. कोरोना संकट असल्याने दर वर्षीच्या तुलनेत यावर्षी स्टॉलची मागणी करणाऱया व्यावसायिकांचीही कमी जाणवत आहे. आतापर्यंत केवळ 33 स्टॉलचे बुकींग झाले असून अद्याप 7 स्टॉलची जागा रिकामी असल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

 कोरोनाचा जोर ओसरल्याने शासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्याने बाजारपेठा पूर्ववत सुरू झाल्या आहेत. सुरूवातीपासूनच कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरलेल्या कराडलाही कोरोनाचा जोर ओसरल्याने दिवाळीच्या तोंडावर नागरिकांत उत्साहाचे वातावरण आहे. परिणामी दिवाळीसाठी कराडची बाजारपेठ सजली आहे. रेडिमेड कपडे, रांगोळी, फटाके, किल्ले, आकाश कंदिलांनी दुकाने सजल्याने कराडकरांना दिवाळीची चाहुल लागली आहे.

Related Stories

शिवभक्तीच्या ऊर्जेतून कलायोगींच्या पेटिंगचा ‘रिमेक’

Archana Banage

राज्य शासनाचा लॉकडाऊन हा मोगलाईचा प्रकार

Patil_p

मराठा आरक्षणाला माओवाद्यांचा पाठिंबा म्हणजे महाविकास आघाडीला धोक्याची घंटा

Archana Banage

परब यांना ईडीचे नोटीस ; संजय राऊत म्हणतात, भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता

Archana Banage

सातारा : अपघातावरून दुचाकी चालकावर गुन्हा दाखल

Archana Banage

कोल्हापूरसह `या’ जिल्ह्यात हवामान आधारित पीक विमा योजना लागू

Archana Banage