Tarun Bharat

यंदा शाही दसरा सोहळा होणार

ऐतिहासिक दसरा चौकातच पुन्हा राजेशाही थाटात सीम्मोलंघन, कोरोनाचे नियम पाळून आयोजन

संजीव खाडे/कोल्हापूर

कोल्हापूरचा ऐतिहासिक शाही दसरा देशविदेशात प्रसिद्ध आहे. करवीरच्या छत्रपती घराण्याने शाही दसऱयाची परंपरा गेली अनेक वर्षे प्राणपणाने जपली आहे. गेल्या वर्षी 2020 मध्ये कोरोनाच्या संकटकाळात ऐतिहासिक दसरा चौकात होणारा सिम्मोलंघनाचा, दसऱयाचा सोहळा रद्द करण्यात आला होता. यंदा मात्र शाही दसरा ऐतिहासिक दसरा चौकात प्रथेप्रमाणे साजरा होणार आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी तरुण भारत'शी बोलताना यंदाचा शाही दसरा सोहळा साजरा होईल. कोरोनाचे नियम पाळून आयोजन करण्यात येईल. त्यासाठी नियोजनही सुरू करण्यात आल्याची माहिती दिली. गतवर्षी 2020 मध्ये ऐतिहासिक दसरा चौकात रंगणारा शाही दसरा सोहळा रद्द करण्याचा अत्यंत महत्वाचा निर्णय श्रीमंत शाहू महाराज यांनी घेतला. त्यावेळी ज्या पद्धतीने कोरोनाचा प्रादुर्भाव होता, त्यावर गांभिर्याने विचार करत शाहू महाराजांनी शाही दसरा सोहळा रद्द करून तो जुना राजवाड्यातील तुळजाभवानी मंदिरात प्रतिकात्मकरित्या साजरा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोहळा झाला होता. दसरा रद्दचा निर्णय घेताना शाहू महाराजांनी तमाम करवीरवासीयांना कोरोनामुळे प्रत्येकाचा जीव महत्वाचा आहे, जीवन महत्वाचे आहे. यंदा जर आपण काळजी घेतली, दक्षता घेतली तर पुढील वर्षी आपण जीवंत राहून शाही दसरा साजरा करू शकतो. त्यामुळे घरीच राहून कुटुंबांची काळजी घेत दसरा साजरा करा, असे आवाहनही त्यांनी केले होते. त्याचे पालन समस्त करवीरवासीयांनी केले होते.

यंदाचा शाही दसरा सोहळा होणार गतवर्षी कोरोनामुळे शाही दसरा सोहळ्याला मुकावे लागलेल्या कोल्हापूरवासीयांना यंदा मात्र या अविस्मरणीय सोहळ्याचा आनंद लुटता येणार आहे. कोरोनाचा धोका कमी झाल्याने सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत. मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे शासनाने भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी राज्यातील सर्व मंदिरे खुली होणार असल्याने भाविकांतही आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे दसरा चौकात होणारा शाही दसरा सोहळा यंदा प्रतिवर्षीप्रमाणे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दस्तुरखुद्द श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनीतरुण भारत’शी बोलताना ही माहिती दिली. कोरोनाचे नियम पाळत दसऱयाचा सोहळा होईल, नागरिकांनीही सोहळ्यात सहभागी होताना आवश्यक ती काळजी, दक्षता घ्यावी, सोहळा साजरा करण्यासाठी आवश्यक ते नियोजन सुरू आहे, असेही शाहू महाराज यांनी सांगितले.

शाही दसरा हा आपल्या कोल्हापूरच्या संस्कृतीचा, परंपरेचा ऐतिहासिक असा ठेवा आहे. या सोहळ्याचा आनंद अवर्णनीय असतो. गतवर्षी 2020 मध्ये कोरोनामुळे सोहळा रद्द केला होता. यंदा मात्र तो प्रथेनुसार दसरा चौकातच होईल. -श्रीमंत छत्रपती शाहू महाराज

Related Stories

प्रायोगिक लसीकरण उद्यापासून

Archana Banage

एकनाथ खडसे यांनी घेतली राज्यपाल कोश्यारींची भेट

Abhijeet Khandekar

निलंबित आमदाराच्या कारने 23 जणांना चिरडले

datta jadhav

ओडिशामधील व्यापाऱ्याने बनवला 3.5 लाख रुपयांचा ‘सोन्याचा मास्क’

Tousif Mujawar

धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; गाडीत पिस्तुल ठेवतानाचा व्हिडीओ व्हायरल

Archana Banage

मिरज शहर पोलीस ठाण्यातच तरुणाने घेतले पेटवून

Archana Banage