Tarun Bharat

यजमान इंग्लंडचा डाव 204 धावांत खुर्दा

वृत्तसंस्था / साऊदम्प्टन

कर्णधार जेसॉन होल्डर (6-42) व शेनॉन गॅब्रिएल (4-62) यांच्या भेदक माऱयासमोर यजमान इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 204 धावांमध्येच खुर्दा झाला. तीन-एक महिन्यांच्या कालावधीनंतर होत असलेल्या या पहिल्यावहिल्या आंतरराष्ट्रीय लढतीत होल्डर व गॅब्रिएल यांनी इंग्लिश फलंदाजांना अपेक्षेपेक्षाही अधिक चाचपडणे भाग पाडले. यामुळे, यजमान संघाचा डाव 67.3 षटकात गुंडाळला गेला. बेन स्टोक्सने 97 चेंडूत 7 चौकारांसह सर्वाधिक 43 धावांचे योगदान दिले. प्रेक्षकांना प्रवेश न देता क्रिकेटच्या नव्या पर्वाला या निमित्ताने सुरुवात झाली. प्रत्युत्तरात अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला, त्यावेळी विंडीजने 7 षटकात बिनबाद 21 धावा केल्या.

एजिस बॉल स्टेडियमवर इंग्लंडने 1 बाद 35 या मागील धावसंख्येवरुन डावाला जरुर सुरुवात केली. पण, त्यांच्या फलंदाजांना घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ घेता आला नाही. उलटपक्षी, विंडीज गोलंदाजांसमोर त्यांना झगडतच रहावे लागले. होल्डर-गॅब्रिएल या उभयतांनीही उसळत्या गोलंदाजीवर भर देत चांगलेच त्यांना जखडून ठेवले.

यजमान संघातर्फे कर्णधार बेन स्टोक्सशिवाय, जोस बटलर (6 चौकारांसह 35), बेस (4 चौकारांसह 31), सलामीवीर रोरी बर्न्स (4 चौकारांसह 30) यांना धावफलक हलता ठेवण्यात काही प्रमाणात यश लाभले. बेन स्टोक्स व जोस बटलर यांनी सहाव्या गडय़ासाठी 67 धावा जोडल्या, ही इंग्लंडच्या डावातील सर्वोच्च भागीदारी ठरली. इतका अपवाद वगळता मात्र त्यांना सातत्याने अपयशच पदरी आले.

Related Stories

शर्मादाची झील देसाईविरुद्ध अंतिम लढत

Patil_p

तनिषा-इशान यांचे आव्हान समाप्त

Amit Kulkarni

व्हेगातर्फे पोलिसांना पीपीई किटस्, मास्क

Patil_p

बांगलादेश, नेपाळचे विजय

Patil_p

दुसऱया हॉकी सामन्यातही भारताची सरशी

Patil_p

स्टीव्ह स्मिथचे भारतीय जलद गोलंदाजांना जाहीर आव्हान

Patil_p