Tarun Bharat

यड्राव मध्ये सापडला कोरोनाचा पहिला रुग्ण

वार्ताहर / यड्राव

शिरोळ तालुक्यातील​ यड्राव​ येथे कोरॊनाचा पहिला रुग्ण आढळला. अल्फोंनसा स्कूल जवळ गावठाण बेघर वसाहत लगत असलेल्या निर्मळ​ मळ्यातील 23 वर्षीय तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.​ त्यामुळे या परिसरात खळबळ माजली आहे.​ निर्मळ मळ्यातील​ तरुणाला​ शनिवारी सकाळी ताप व सर्दी त्रास होऊ लागल्याने तो इचलकरंजीतील आय जी एम रुग्णालयात उपचारासाठी गेला.
त्यावेळी त्याचा स्वॅब घेऊन​ तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे रात्री सांगण्यात आले.​

त्यामुळे​ ग्रामपंचायतीने रात्रीच या परिसरात​ रिक्षाद्वारे​ पुकारून नागरिकांना दक्षतेच्या सूचना दिल्या. व सकाळी ग्रामपंचायतीचे कर्मचारी येऊन सदर परिसर बॅरिकेट्स पत्रे लावून सील करण्यात आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पी.ए.भाटे​ यांनी​ कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या तरुणाचा घरातील व आसपास राहणाऱ्या नागरिकांची थरमल टेस्टिंगद्वारे तपासणी केली. व त्या तरुणांच्या संपर्कात असलेल्या आई-वडील यांना​ आगर येथील स्वॅब तपासणी केंद्रात पाठविण्यात आले.

तर औद्योगिक वसाहतीत ज्या कारखान्यात तो तरुण कामाला होता. तेथील नऊ कर्मचारी त्याच्या संपर्कात आल्याने त्यांना सध्या​ विलगिकरण करण्यात आले आहे.​ यड्राव परिसरात​ प्रथमच कोरोनाचा रुग्ण सापडल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.​

Related Stories

राष्ट्रवादीची आज महत्त्वाची बैठक ;शरद पवार कार्यालयात पोहोचले

Archana Banage

कोल्हापूर : हातकणंगलेत कोरोनाचा दुसरा बळी

Archana Banage

नव – नवीन येणाऱ्या रोगांपुढे डॉक्टर ही हात टेकतील

Archana Banage

शिवशक्ती- भीमशक्तीची अखेर घोषणा; लोकशाही टिकवण्यासाठी एकत्र- उद्धव ठाकरे

Abhijeet Khandekar

भाजी विक्रेत्यास कोरोनाची बाधा

Patil_p

भारताची लोकसंख्या एक अब्ज ३०० कोटी- इम्रान खान

Archana Banage