Tarun Bharat

यल्लम्मा मंदिरात पूजा करण्यास परवानगी द्या

Advertisements

कोल्हापूर श्री रेणुका यल्लम्मा देवस्थान मंडळाचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन

प्रतिनिधी / बेळगाव

सौंदत्ती येथील श्री यल्लम्मा देवीचे भक्त कोल्हापूरसह महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात आहेत. दरवषी महाराष्ट्रातून भक्तगण मोठय़ा संख्येने येत असतात. मात्र, कोरोनामुळे श्री यल्लम्मा देवीसह इतर मंदिरांमध्ये प्रवेश बंद करण्यात आला आहे. मात्र, आम्हाला दरवषीप्रमाणे धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी काही मोजक्मयाच भक्तांना प्रवेश द्यावा, अशी मागणी कोल्हापूर येथील श्री रेणुका यल्लम्मा देवस्थान मंडळाच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली
आहे.

दरवषी यल्लम्मा देवीच्या यात्रेला कोल्हापूरचे भक्तगण येत असतात. यावेळी आम्ही देवीच्या पूजेच्या साहित्यासह येत असतो. पारंपरिक पद्धतीने दरवषी यात्रा साजरी करतो. या यात्रेला हजारोंच्या संख्येने आम्ही येत असतो. मात्र, यावषी कोरोनामुळे आम्ही काही मोजकीच मंडळी मंदिरात येऊन विधिवत पूजा करणार आहे. तेव्हा आम्हाला परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी 31 डिसेंबरपर्यंत आम्ही सर्वच मंदिरांमध्ये प्रवेशबंदी केली आहे. त्यामुळे योग्य विचारविनिमय करून काही मोजक्मया मंडळींना पूजा-अर्चा करण्यास मुभा देण्याबाबत चर्चा करून निर्णय घेऊ, असे सांगितले.

यावेळी शिवाजी सुंठकर, वरुण बोडेकर, मदनआई शांताबाई जाधव, महेश रेडेकर, उमेश यादव, शिवाजी आळवेकर, प्रकाश बेळगाव, रविंद्र पाटील, किसन सुंठकर यांच्यासह कोल्हापूर येथील भक्त उपस्थित होते.

Related Stories

यंदाच्या गणेशोत्सवाला कडक नियमांचे मखर

Tousif Mujawar

मच्छे निराश्रित केंद्रात फुलली बाग

Amit Kulkarni

पं. पी. व्ही. कडलास्करबुवा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आज संगीतोत्सव

Amit Kulkarni

जिह्यात उद्योग खात्रीतून 60 हजार कामगारांना काम

Patil_p

निपाणीत वळीवाची सुखद बरसात

Patil_p

केएलई सोसायटीतर्फे मुख्यमंत्री रिलीफ फंडला 2 कोटीचा निधी

Tousif Mujawar
error: Content is protected !!