Tarun Bharat

यवतेश्वर घाटातील ”त्या” बिबट्यांचा व्हिडीओ व्हायरल; वनक्षेत्रपालांनी केला खुलासा

Advertisements

वार्ताहर / कास

सातारा कासरोड वरील यवतेश्वर घाटात वारंवार बिबटयाचा वावर असल्याच दिसुन येत आहे. मात्र नुकताच घाटातील भिंतीवर दबा धरून बसलेल्या दोन बिबट्यांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने स्थानिकांसह प्रवासी पर्यटकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मात्र तरुण भारत प्रतिनिधींनी सातारा वनक्षेत्रापाल निवृत्ती चव्हाण यांच्याशी संपर्क साधत माहीती घेतली असता, या व्हायरल व्हिडीओनुसार आम्ही सकाळीच टिम सोबत प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पहाणी केली असता तेथे कोठेच बिबट्याच्या हलचाली पाऊल खुणा किंवा ते ठिकाण आढळुन आले नाही. त्यामुळे हा व्हायरल व्हिडीओ जुनाच असेल किंवा ईतर ठिकाणचा असुन व्हायरल होणाऱ्यांकडुन माहीती घेतली असता प्रत्येक जण आम्ही नाही. त्यांनी केलाय त्यामुळे प्रत्यक्षात कोणीही पुढे येत नसुन स्थानिकांशी संवाद साधताना नागरीकांनी घाबरून जाऊ नये असे अवाहन त्यांनी यावेली केले आहे.

सातारा हा निसर्गसंपदेने नटलेला परिसर असुन येथे बिबट्यासह अन्य प्राण्यांचा आधिवास आहे. ते त्यांच्या आधिवासात भ्रमंती करत असतात मात्र बिबटया कोणाला दिसल्यास त्यांनी घाबरून जाऊ नये कोणी व्हिडीओ फोटो काढल्यास वनविभागाशी त्वरीत संपर्क साधावा जेणेकरून खरी माहीती मिळून वनविभागाला ऊपाययोजना करता येथील. मात्र खात्री न झालेले आपल्याकडील व्हिडीओ व्हायरल करून जनतेला घाबरून सोडू नये. अलिकडे सोशल मिडीयावर कोणीही जुने कुठलेही व्हिडीओ कोणत्याही ठिकाणाचे नाव देऊन व्हायरल करत आहेत. त्यामुळे नागरीकांनी त्याची सत्यता पटल्या शिवाय घाबरून जावु नये. बिबट्या हा घाबरणारा मवाळ प्राणी असुन शक्यतो तो माणसावर हल्ला करत नाही. त्यामुळे नागरीकांनी घाबरून न जाता वनविभागाशी संपर्क साधावा असे अवाहन वनविभागाने केले आहे.

Related Stories

जागा अडवणाऱ्यांना घरी बसवा : आ. शिवेंद्रराजे

datta jadhav

सातारा जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक; ११८४ कोरोनाबाधित रूग्ण

Amit Kulkarni

शिवभोजन थाळीसाठी सर्वसामान्याच्या रांगा

Patil_p

दरोडय़ाच्या गुन्हय़ातील सराईत गुन्हेगार जेरबंद

Patil_p

साताऱ्यात ऑक्टोबरमध्ये वृक्ष संमेलन

datta jadhav

महाराष्ट्र स्कुटर्समध्ये इथेनॉलवर चालणाऱया दुचाकीचे उत्पादन सुरु करा

Patil_p
error: Content is protected !!