Tarun Bharat

यवतेश्वर घाटात 300 फुट दरीत कार कोसळली

Advertisements

दोन जण गंभीर, उपचारासाठी रुग्णालयात दाखल

वार्ताहर/ कास

सातारा शहराच्या दिशेने निघालेल्या चारचाकी कारला यवतेश्वर घाटात अपघात झाला असुन गाडी तिनशे ते चारशे फुट खोल दरीत कोसळली आहे. यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

 सद्या पावसाळी पर्यटन सुरु असून कास परिसरात पर्यटकांची वर्दळ वाढली आहे.  मुसळधार पावसासोबत सोसाटय़ाचा वारा वेगाने वाहत आहे. याच वाऱयाच्या वेगासारखे काही महाठक वाहनाची रपेट उडवताना दिसत असून या मार्गावर अपघातांची मालिका वाढताना दिसत आहे. शुक्रवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास यवतेश्वर घाटातुन सातारा शहराच्या दिशेने भरधाव वेगाने जात असताना चारचाकी वाहन महादरे तळेच्या दिशेला रस्त्याकडेचा जीर्ण झालेला संरक्षक कठडा तोडुन  तिनशे फुटाहुन अधिक खोल दरीत कोसळल्याची माहिती शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्स यांच्या जवानाला नागरिकांनी फोनद्वारे कळविली. यानंतर तत्काळ घटनास्थळी तत्काळ ट्रेकर्सचे जवान दाखल झाले. त्यांनी पोलीस कर्मचारी सुहास पवार यांच्या सहकार्यासह स्थानिक नागरिक, इतर वाहन चालक यांच्या मदतीने बचावकार्य करताना या वाहनात सात प्रवासी असल्याची माहिती समोर आली. दोन जण गंभीर जखमी अवस्थेत दरीत कोसळले होते. त्यांना दरीतुन बाहेर काढण्यात एक तासाभराच्या अथक परिश्रमानंतर शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सच्या जवानांना यश आले.  जखमींना पुढील उपचारासाठी सातारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Related Stories

गोंधळ ‘लॉक’ अन् भीती ‘डाऊन’ करा

datta jadhav

ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या ठिकाणी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

Abhijeet Shinde

‘संजय राऊत मातोश्रीचे तर वडेट्टीवार सोनिया गांधींकडे घरगडी’, भाजप आमदाराची बोचरी टीका

Abhijeet Shinde

सोलापूर : खासदार ओमराजे यांचा बार्शीतील सुर्डी गाव दत्तकचा प्रस्ताव

Abhijeet Shinde

सोलापुरात नव्याने सात कोरोना बाधित रुग्णांची भर

Abhijeet Shinde

उद्योगांचा कोविडविषयक टास्क फोर्स

Abhijeet Shinde
error: Content is protected !!