Tarun Bharat

यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेला प्रथम पुरस्कार

यवतमाळ जिल्हा परिषदेला द्वितीय तर सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेला तृतीय पुरस्कार

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली पुरस्कारांची घोषणा


प्रतिनिधी / कोल्हापूर

यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेने राज्यस्तरीय उत्कृष्ट जिल्हा परिषदेचा प्रथम पुरस्कार पटकावला असून यवतमाळ जिल्हा परिषदेने द्वीतीय आणि सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेने तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावला असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. प्रथम, द्वीतीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त या जिल्हा परिषदांसाठी अनुक्रमे ३० लाख रुपये, २० लाख रुपये आणि १७ लाख रुपये तसेच स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

राज्यस्तरीय उत्कृष्ट पंचायत समितीमध्ये प्रथम क्रमांक कुडाळ (जि. सिंधुदूर्ग) पंचायत समितीने पटकावला. कागल (जि. कोल्हापूर) पंचायत समितीने द्वीतीय तर भंडारा (जि. भंडारा) पंचायत समितीने तृतीय क्रमांक पटकावला. या पंचायत समित्यांसाठी अनुक्रमे २० लाख रुपये, १७ लाख रुपये आणि १५ लाख रुपये तसेच स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

यशवंत पंचायत राज अभियान सन २०२०-२१ (मुल्यांकन वर्ष २०१९-२०) अंतर्गत हे पुरस्कार आहेत. दरवर्षी यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिनी १२ मार्च रोजी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा या दिवशी हा कार्यक्रम होणार नाही.

विभागस्तरीय पुरस्कारांचीही घोषणा

मंत्री मुश्रीफ यांनी यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत विभागस्तरीय उत्कृष्ट पंचायत समित्यांच्या पुरस्कारांचीही घोषणा केली. याअंतर्गत कोकण विभागात कुडाळ (जि. सिंधुदूर्ग), मालवण (जि. सिंधुदूर्ग), सुधागड-पाली (जि. रायगड), नाशिक विभागात राहाता (जि. अहमदनगर ) , नाशिक (जि. नाशिक), कळवण (जि. नाशिक), पुणे विभागात कागल (जि. कोल्हापूर), गडहिंग्लज (जि. कोल्हापूर), माढा/कुर्डूवाडी (जि. सोलापूर), औरंगाबाद विभागात लातूर (जि. लातूर), नांदेड (जि. नांदेड), शिरुर अनंतपाळ, अमरावती विभागात अचलपूर (जि. अमरावती), दर्यापूर (जि. अमरावती), राळेगाव (जि. यवतमाळ) तर नागपूर विभागात भंडारा (जि. भंडारा), पोभुर्णा (जि. चंद्रपूर), कामठी (जि. नागपूर) या पंचायत समित्यांनी अनुक्रमे प्रथम, व्दीतीय आणि तृतीय क्रमांकांचे पुरस्कार पटकावले. या पंचायत समित्यांना प्रत्येक विभागात अनुक्रमे ११ लाख रुपये, ८ लाख रुपये आणि ६ लाख रुपये तसेच स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र वितरीत करण्यात येईल.

Related Stories

दुचाकी घसरून झालेल्या अपघातात चिमुकल्याचा मृत्यु

Abhijeet Khandekar

खासदारांच्या घरावर मोर्चे काढण्याचे अधिकार कुणी दिले-दीपक केसरकर

Abhijeet Khandekar

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलत अतिक्रमण करणाऱ्या सहा जणांवर गून्हा दाखल

Archana Banage

कोल्हापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी पंचायत समिती सदस्यांना मतदानाचा हक्क मिळावा

Archana Banage

कोल्हापुरात कोरोनाचा कहर सुरूच; आज २३ नवे रुग्ण

Archana Banage

कोल्हापूरच्या खासदारांसह पत्नी, मुलगा कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage