Tarun Bharat

यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहाला धोंडशिरेची दुखापत

अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहाला धोंडशिरेची दुखापत झाली असल्याचे सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने स्पष्ट केले. सनरायजर्स हैदराबादला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर त्यांचे या मोसमातील आव्हान संपुष्टात आले. पण, त्यापूर्वी साहा दुखापतग्रस्त झाल्याने आता आगामी ऑस्ट्रेलिया दौऱयात तो भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करु शकणार का, याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. साहाच्या निमित्ताने विविध प्रँचायझींचा आत्मकेंद्री दृष्टिकोन देखील चर्चेत आला आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे फिजीओ नितीन पटेल यांचा वैद्यकीय अहवाल काय असेल, यावर देखील बरेच काही अवलंबून असणार आहे. दिल्ली कॅपिटल्स संघव्यवस्थापनाने आयपीएलच्या दुसऱया टप्प्यात साहाला दुखापतग्रस्त असताना देखील सातत्याने खेळवण्याचा निर्णय घेतला आणि याचा त्याला फटका बसला असल्याचे प्रातिनिधीक चित्र आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध 14 व्या व शेवटच्या साखळी सामन्यात त्याला खेळवले गेले, त्यावेळी ही दुखापत आणखी चिघळली गेली असेल, असे सध्याचे संकेत आहेत. अर्थात, साहाच्या दुखापतीचे स्वरुप कसे आहे, हे अहवालानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे.

साहाची दुखापत ग्रेड 1 टियरची असेल तर त्याला 4 आठवडय़ांची विश्रांती घ्यावी लागेल आणि त्यानंतर तो ऑस्ट्रेलिया दौऱयासाठी रवाना होऊ शकेल. जर ग्रेड 2 टियर असेल तर मात्र त्याला यातून सावरण्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. ऑस्ट्रेलिया दौऱयासाठी यापूर्वी जाहीर केल्या गेलेल्या संघात ऋषभ पंत व संजू सॅमसन यांचे पर्याय उपलब्ध आहेत. फलंदाजी मजबूत करण्यासाठी विदेशातील सामन्यांसाठी ऋषभ पंत तर देशांतर्गत लढतींसाठी सरस यष्टीरक्षक असावा, यासाठी साहाला संधी देण्याचे भारतीय संघव्यवस्थापनाचे अलीकडील धोरण आहे. याशिवाय, एमएसके प्रसाद निवड समिती अध्यक्ष असताना आंध्र प्रदेशचा कोना भारतला तिसऱया पसंतीचा यष्टीरक्षक म्हणून पसंती देण्यात आली होती.

Related Stories

मेल जोन्स यांचा राजीनामा

Patil_p

सूर्यकुमारची एकाकी झुंज निष्फळ

Patil_p

भारताने जिंकली वर्ल्डकपची ‘ड्रेस रिहर्सल’!

Patil_p

मेदवेदेव्ह-नदाल अंतिम फेरीत दाखल

Patil_p

डी कॉक द.आफ्रिकेचा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू

Patil_p

रितू फोगटचा सलग चौथा विजय

Patil_p