Tarun Bharat

….याचा अर्थ राष्ट्रवादी-भाजप एकत्र येणार असे नाही : प्रवीण दरेकर

Advertisements

कोल्हापूर प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट झाली. या भेटीचा अर्थ लगेच राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार, असा लावू नका. असे आवाहन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले आहे. तसेच देश हितसंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणालाही पाठीशी घालणार नाहीत. तत्वाच्या विरोधात जाणाऱ्यावर कारवाई होतच राहील. असेही दरेकर म्हणाले. कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

कोल्हापूर उत्तर निवडणुकीचे भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर आज कोल्हापुरात आले आहेत. आज सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे नेते आहेत. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींची कधीही भेट घेऊ शकतात. या भेटीकडे मी गांभीर्याने पाहत नाही. मात्र याचा अर्थ लगेच राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येणार, असे लावू नका असे प्रवीण दरेकर म्हणाले.

कदाचित ही भेट तपास यंत्रणेच्या ससेमिरा थांबवण्यासाठी ही असू शकते. मात्र त्यावर आपण योग्य भाष्य करणार नाही. मात्र देश हितासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या तत्वांशी तडजोड करणार नाहीत. तत्त्वांच्या विरोधात असणाऱ्या प्रवृत्तीला पाठीशी घालणार नाहीत. त्यांच्यावर कारवाई होणारच. मात्र या स्नेह भेटीत काही राजकीय गुपित घडले असे नाही. असेही दरेकर म्हणाले.

ईडीची कारवाई झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी खालच्या पातळीत जाऊन भाजपवर टीका केली. मात्र खालच्या पातळीवरची भाषा ही महाराष्ट्रात जनतेने पाहिली आहे. पण अहंपणाचा उन्मदाचा आता पर्दाफाश होताना दिसतोय. असा टोलाही दरेकर यांनी लगावला.

Related Stories

जिल्हा रुग्णालयात पोलीस ठाण्याचे घोंगडे भिजतच

Patil_p

जिल्हा न्यायालयानजीक भीषण अपघात; कोल्हापूरचे 2 युवक ठार

datta jadhav

कराड विमानतळ कालपासून अंधारात

Patil_p

रत्नागिरी : दापोलीत कोरोना लसीकरणाचा प्रारंभ

Abhijeet Shinde

भाजपने विधानसभा विसर्जित करून नव्याने निवडणुका घेण्याचे धाडस दाखवावे

Abhijeet Shinde

कोल्हापुरात एसटीवर दगडफेक; चालक जखमी

Sumit Tambekar
error: Content is protected !!