Tarun Bharat

..यापुढे सा.बा.खात्यातील कंत्राटी कामगार पद्धती कालबाहय़

कंत्राटी कामगारांना सोसायटीत सामावून घेणार

प्रतिनिधी/ फोंडा

सार्वजनिक बांधकाम खात्यातील कंत्राटी पद्धतीवरील कामगारांना एप्रिल 2020 नंतर पीडब्ल्युडी सोसायटीत सामावून घेण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. गोव्यातील खाण कंपनीमध्ये असलेले मायनिंग पीट हे पाणी साठविण्याचे स्रोत बनलेले असून त्याचा खांडेपार नदीची पातळी वाढविण्यासाठी महत्वाचा उपयोग होत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. विकासाच्या आघाडीवर आपले सरकार अग्रेसर असून मोपा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या कचाटय़ात अडकलेला प्रश्न राज्य सरकारच्या बाजूने झालेला असून त्याच धर्तीवर खाण कंपनीचा प्रश्नही सुटण्याबाबत आपण आशावादी असल्याचा ते म्हणाले.

खांडेपार नदीवरील ओपा पाणी प्रकल्पातील 27 एमएलडीच्या जलशुद्धिकरण प्रकल्पाचे लोकार्पण काल शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक प्रभू पाऊसकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या उद्घाटन सोहळय़ाला, फोंडय़ाचे आमदार रवी नाईक, नगराध्यक्ष व्यंकटेश नाईक, कुर्टीचे पंचसदस्य सांतान फर्नाडीस, उपनगराध्यक्ष अपुर्व दळवी, कुर्टी जि.प.सदस्य मोहन वेरेकर, बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर, अनिल रिंगणे, कंत्राटदार दिनेश पटेल व इतर मान्यवर उपस्थित होते.  27 एमएलडीच्या जलशुद्धिकरण प्रकल्पानंतर पणजी कदंब पठार, राजधानी पणजी, सांतिनेज, सांतापुझ, तालीगांव व आसपासच्या परिसरात 15 एमएलडी पाण्याची भासत असलेली टंचाई प्रश्न कायमचा मिटणार आहे.

कंत्राटी कामगारांना गोड खबर, पाणी जपून वापरा

 सद्यपरिस्थितीतही मागील पंधरा वर्षापुर्वीपासून सा.बा. खात्यात चार पाच पद्धतीनुसार कामगार काम करीत आहे. सा. बा. विविध विभागात कंत्राटी कामगारांना गोड खबर देताना सर्व कंत्राटी कामगारांना 1 एप्रिलपर्यत पीडब्ल्युडी सोसायटीत सामाफवून घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यानी केली. तसेच 31 मार्चपर्यत राज्यभरात प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ पिण्याच्या सोय उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले. आरक्षित वनक्षेत्रात असलेल्या घरांसाठी कुपनलिकाची सोय करण्यात येणार आहे. सरकार पाणी शुद्धिकरणानंतर जनतेपर्यंत पोचविण्यासाठी सुमारे रू. 15 प्रति घनमिटर खर्चित असून त्यासाठी जनतेकडून फक्त अडीच रूपये वसुल करत असल्याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी, त्यामुळे जनतेने शुद्ध पाणी जपून वापरण्याचे आवाहन डॉ. सावंत यांनी केले.

प्रकल्पाला मे महिन्यातही पाण्याची व्यवस्था –

 सदर प्रकल्प मे महिन्याच्या अखेरीस बंद पडणार असल्याचा खो घालणाऱया व  अफवांचे पिक पसविणाऱयांचा माजी मंत्र्यांचा खरपूस समाचार बांधकाम मंत्री पाऊसकर यांनी घेतला. सदर प्रकल्प मे महिन्यातही संपुर्णरित्या चालू ठेवण्यासाठी नदी व परीवहन खात्याने दक्षता घेतलेली आहे. खांडेपार नदीला जोडणाऱया रगाडा नदी  त्याशिवाय मायनिंग पीटातून पाण्याची व्यवस्था व विविध ठिकाणी बंधारे उभारण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. केंद्र सरकराच्या ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत 3 हजार कोटीचा निधी मंजूर झालेला आहे. येत्या तीन वर्षात राज्यभरात स्वच्छ पाणी देण्यासाठी आपण बांधिल असल्याचे त्यांनी सांगितले. 

फेंडय़ासाठी सुविधा उपलब्ध करा- रवी नाईक

आमदार रवी नाईक यांनी डॉ. प्रमोद सावंत यांना फोंडयाच्या विकासासाठी तत्परतेने काम करण्यासाठी आपल्या मिष्किल शैलीत विनंती पेली. तसेच फोंडा तालुका राज्यातील तिसरा जिल्हा व्हावा या मागणीचाही जोर धरला. फोंडयातील जनतेसाठी पाणी व वीज समस्येच्या निवारणासाठी भूमिगत वीजवाहिन्याची अंत्यत गरज असल्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले.

 मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण व दीपप्रज्ज्वलीत करुन 27 एमएलडी पाणी शुद्धिकरण प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. त्यापुर्वी कळ दाबून पाणी प्रकल्पासाठी पाणी सोडण्यात आले. प्रकल्पासाठी महत्वाचे योगदान दिलेल्या सर्व कर्मचारी व कंत्राटदारांना यावेळी मुख्यमंत्र्याच्याहस्ते गौरविण्यात आले. 

स्वागत व प्रास्ताविक प्रधान अभियंता उत्तम पार्सेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद भगत यांनी तर अनिल रिंगणे यांनी आभार मानले.

Related Stories

19 वर्षीय दत्तप्रसाद गावकरचा अपघाती मृत्यू

Amit Kulkarni

चोडण साऊद येथे उद्या सांज्याव

Amit Kulkarni

सहकार कायद्यात बदल व सुधारणांची गरज – नरेश सावळ

Patil_p

फोंडय़ात कांदा अजूनही शंभरीत

Patil_p

‘त्या’ खारफुटींची अधिकाऱयांकडून पाहणी

Amit Kulkarni

सांखळीत खुद्द मुख्यमंत्र्यांची, फोंड्यात कृषीमंत्र्यांची कसोटी !

Amit Kulkarni