Tarun Bharat

यामागुचीला धक्का देत वांग अजिंक्य

वृत्तसंस्था/ मनिला, फिलिपाईन्स

बिगरमानांकित चीनच्या वांग झियीने जपानची माजी वर्ल्ड चॅम्पियन अकाने यामागुचीला पराभवाचा धक्का देत येथे झालेल्या बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपचे महिला एकेरीचे जेतेपद पटकावले.

जागतिक क्रमवारीत 16 व्या स्थानावर असणाऱया वांगला या सामन्यावेळी पाठदुखीचा त्रास होऊ लागल्याने तिला उपचार करून घ्यावे लागले. तिने विद्यमान विजेत्या यामागुचीवर 15-21, 21-13, 21-9 अशी मात करीत जेतेपद पटकावले. सुमारे दीड तास ही लढत रंगली होती. वांगने शनिवारी उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाच्या द्वितीय मानांकित ऍन से युंगला हरविले होते. 22 वर्षीय वांगला पहिला गेम गमवावा लागला होता. त्यातून सावरत तिने दुसरा गेम जिंकून बरोबरी साधली. निर्णायक गेममध्ये तिने 16-5 अशी भक्कम आघाडी घेतली, तेव्हा ही सामना सहज जिंकणार असेच वाटले होते. याचवेळी तिला पाठदुखीचा त्रास होऊ लागल्याने तिला उपचार घ्यावे लागले. या छोटय़ाशा ब्रेकमुळे यामागुचीला थोडा दिलासा मिळाला. यामागुचेने सर्व अनुभव पणास लावत पकड मिळविली आणि वांगकडून चुका होऊ लागल्यानंतर एक 30 शॉट्सची दीर्घ रॅली जिंकत यामागुचीने तिला 19-19 वर गाठले. मात्र वांगने सर्व शक्ती पणाला लावत पहिला चॅम्पियनशिप गुण मिळविला. त्यावर आणखी एक दीर्घ रॅली झाली, त्यात यामागुचीने परतीचा एक फटका नेटवर मारल्यानंतर वांगने कोर्टवर पडत आनंद साजरा केला. ती पहिल्यांदाच आशियाई चॅम्पियन बनली आहे.

Related Stories

भारतीय फलंदाजांच्या मार्गदर्शनासाठी द्रविडला ऑस्ट्रेलियाला पाठवावे : वेंगसरकर

Patil_p

सर्वोत्तम मासिक क्रिकेटपटूसाठी यादी जाहीर

Patil_p

न्यूझीलंडविरुद्ध भारताचा धुव्वा

tarunbharat

व्हीनसचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त

Patil_p

पाकच्या शदाब खानला दुखापत

Patil_p

मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताची चार पदके निश्चित

Patil_p