Tarun Bharat

यालागिं मुकुंद नाम हें स्पष्ट

Advertisements

आपण हरिशी विवाह करण्यास इच्छुक आहोत हे ती सुंदरी बोलून गेली खरी! पण लगेच तिच्या मनात शंका आली.

झणें हा म्हणेल मातेंचि वरिं । यालागिं पहिलेंचि निरुत्तर करी ।

जे मी वांछितें वर श्रीहरि । त्यावीण न वरिं त्रैलोक्मयीं ।

म्हणसी हरि हें बहुतांसि नाम । तरी ज्याचे हृदयीं श्रीवत्सलक्ष्म ।

ममाभीष्ट तो पुरुषोत्तम । हा दृढ नेम मम हृदयीं ।

म्हणसी दुर्लभ त्याची प्राप्ती । केविं तूं वरिसी तयाप्रति ।

तरी अनाथसंश्रय तो श्रीपति । माझी आर्ति पुरवील ।

तूं तेथ करिसी अनु÷ान । तो वैकुंठीं विराजमान ।

त्यापें जाऊनि सांगेल कोण । ऐकें वचन यदर्थीं ।

षड्गुणैश्वर्यसंपन्न हरि । वसे सर्वांच्या अभ्यंतरिं ।

ज्याची व्याप्ति सचराचरिं । तो मजवरी संतोषो ।

स्वभक्ताचे निरसूनि कष्ट । कृपेनें पुरवी तदभीष्ट ।

यालागिं मुकुंद नाम हें स्पष्ट । पढती श्रे÷ तिहीं लोकीं ।

कोण तूं म्हणोनि तुवां पुशिलें । तरी तेंही कथितें परिसें वहिलें ।

चातुर्य देखोनि अर्जुनें केलें । आश्चर्य आपुले हृत्कमळीं ।

या अर्जुनाच्या मनात माझ्याशी लग्न करण्याची इच्छा निर्माण झाली तर काय करावे? असा तात्काळ विचार करून ती सुंदरी घाईघाईने अर्जुनाला पुढे म्हणाली – तू म्हणशील, तुला हरिशीच लग्न करायचे आहे ना? मग, या त्रिलोकात हरि हे नाव अनेकांचे असते. पण मी त्याच हरि बरोबर विवाह करू इच्छिते ज्याच्या हृदयावर श्रीवत्सलांछन चिन्ह आहे. मला त्याच पुरुषोत्तमाशी विवाह करायचा आहे. हा माझ्या मनाचा दृढ निश्चय आहे. तू म्हणशील की त्याची प्राप्ती होणे हे अत्यंत दुर्लभ आहे. तू त्याला कसे प्राप्त करून घेशील? तर ऐक! तो हरि अनाथांचा आधार आहे. तो माझ्या मनातील आर्त इच्छा नक्कीच पुरी करेल. तू म्हणशील की तू इथे पृथ्वीवर तप करीत आहेस आणि तो हरि तिकडे वैकुंठात विराजमान आहे. त्याला तुझ्या मनातील इच्छा जाऊन कोण सांगेल? तर ऐक! तो षड्गुणैश्वरसंपन्न हरि सर्वांच्या हृदयात वास करतो. ज्याची व्याप्ती सर्व चराचरात आहे तो माझ्यावर कृपा करो. स्वभक्ताचे कष्ट निवारण करून तो त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करतो म्हणून तो मुकुंद या नावाने प्रसिद्ध आहे. तो माझ्या मनातील इच्छा नक्की पुरी करेल. आता तू विचारलेस म्हणून माझा परिचय करून देते. (अर्जुनाला त्या सुंदरीच्या बोलण्यातील चातुर्य पाहून आश्चर्य वाटले.)

कालज्ञापक माझा पिता । कालिंदी मी त्याची दुहिता । कालिंदी या नामें ख्याता । जाण तत्त्वता मजलागीं। पित्यानें यमुनेचिया सलिलीं । मंदिररचना मदर्थ केली । तेथ वसोनि सर्वकाळीं । नियमें चाळीं तपश्चर्या । कोण काळवरी वससी येथें । ऐसें तूं जरी पुसरी मातें ।

तरी अच्युतदर्शन जालिया त्यातें । वरूनि सांगातें जाईन।

Ad. देवदत्त परुळेकर

Related Stories

‘वेदांत’चा धडा

Patil_p

सामान्यांना सहानुभूती दाखवा!

Patil_p

ग्रामवास्तव्याने समस्यांचे वास्तव येणार का समोर?

Amit Kulkarni

पहिला बायोडेटा

Patil_p

पुलंचे हस्ताक्षर

Patil_p

समाज शलाका !

Patil_p
error: Content is protected !!