Tarun Bharat

याला म्हणतात उत्स्फूर्त स्वयंशिस्त

बेळगावकरांनी घरीच राहून प्रशासनाला केले सहकार्य

बेळगाव / प्रतिनिधी

जगभरात कोरोना महामारीचा फैलाव सुरू आहे. त्यामुळे यापासून वाचण्यासाठी ‘बेक द चेन’ हा एकमेव पर्याय प्रशासनासमोर आहे. त्यामुळेच राज्यसरकारने विकेंड कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी रात्री 9 वाजल्यापासून नाईट कर्फ्यूला सुरूवात करण्यात आली. कोरोना नियंत्रणासाठी बेळगावकरांनी उत्तम साथ दिली. स्वयंस्फूर्तीने व्यवसाय, उद्योग बंद ठेवून नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले. यामुळे शहर, उपनगरांसोबतच तालुक्मयामध्ये शुकशुकाट पसरला होता.

सरकारने दिलेल्या नियमावलीनुसार पहाटे 6 वाजल्यापासून भाजी विक्रीला सुरूवात करण्यात आली. नरगुंदकर भावे चौक तसेच शहापूर, वडगाव, काकतीवेस परिसरात भाजीची विक्री करण्यात येत होती. तसेच किराणा मालाची दुकाने सुरू ठेवण्यात आली होती. खरेदीसाठी नागरिकांची काही प्रमाणात गर्दी झाली होती. सकाळी 10 पूर्वीच दुकाने बंद करण्यात आली. काही ठिकाणी पोलिसांकडून व्यवहार बंद करण्याचे आवाहन केले जात होते. परंतु नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद केल्याचे दिसून आले.

शहराच्या मध्यवर्ती भागात शुकशुकाट

कोरानाची दुसरी लाट जास्त तीव्र असल्याने याचा धोका आपल्या कुटुंबापर्यंत पोहचू नये म्हणून प्रत्येकजण प्रयत्न करीत आहे. शनिवारी शहराच्या मध्यवर्ती भागात 10 पर्यंत फळे, दुध, किराणा मालाची दुकाने सुरू ठेवण्यात आली होती. त्यानंतर ती बंद करण्यात आली. शहरात नरगुंदकर भावे चौक, कांदा मार्केट, रविवार पेठ, गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लेस्कर रोड, खडेबाजार, काकतीवेस, चन्नमा चौक सोबतच इतर गल्ल्यांमध्ये शुकशुकाट दिसून आला. शनिवारी दिवसभरात मेडिकल वगळता इतर सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते.

शहरात प्रवेश करताना तपासणी

शहरात बाहेरून येणाऱयांची पोलिसांकडून तपासणी करण्यात येत होती. विनाकारण प्रवास करणाऱयांना पुन्हा माघारी पाठविले जात होते. नेहरू नगर केएलई, गांधीनगर ब्रिजजवळ, बॉक्साईड रोड कॉर्नर, हिंडलगा रोड, तिसरे रेल्वेगेट, येडियुरप्पा मार्गावर वाहनांची तपासणी करण्यात येत होती.

शहापूर सराफ कट्टय़ावर शांतता

बेळगावचा प्रमुख सराफ कट्टा म्हणून प्रसिद्ध असणाऱया शहापूरच्या सराफ कट्टय़ावर शनिवारी निरव शांतता दिसून आली. खडेबाजार, एसपीएम रोड,  महात्मा फुले रोड, नाथ पै चौक, खासबाग सोबतच प्रमुख मार्गांवर शुकशुकाट पसरला होता. नाथ पै चौक येथे वडगाव, खासबाग परिसरातून येणाऱया नागरिकांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत होती. तसेच त्याठिकाणी बॅरिकेड्स लावून रस्ता बंद करण्यात आला होता. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने व्यवहार बंद ठेवून कोरोनाविरूद्धच्या लढाईत सहभाग घेतला.

वडगावमध्ये व्यवहार ठप्प

वडगावमध्ये शनिवारी सकाळी काही प्रमाणात भाजीपाला व किराणा मालाची दुकाने उघडण्यात आली होती. दहानंतर दुकाने बंद करण्यात आली. वडगाव मुख्य मार्ग, बाजार गल्ली, रयत गल्ली, नाझर कॅम्प, कारभार गल्ली, पाटील गल्ली, येळ्ळूर रोड, यरमाळ रोड येथील सर्व व्यवहार ठप्प होते. या परिसरातील शेतकऱयांनीही कामे बंद करून घरीच राहणे पसंत केले.

टिळकवाडीतील रस्ते ओस

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने टिळकवाडी तसेच परिसरात शनिवारी रस्ते ओस पडले होते. आरपीडी चौक येथे वाहन चालकांची चौकशी करण्यात येत होती. उद्योग तसेच अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश असणाऱयांनाच पुढे सोडले जात होते. विनाकारण फिरणाऱयांना पोलिस पुन्हा माघारी धाडीत होते. तसेच विना मास्क फिरणाऱयांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

उद्यमबाग येथे कारखान्यांची धडधड

बेळगावचा आर्थिक कणा म्हणून ओळखल्या जाणाऱया उद्यमबाग येथे शनिवारी कारखान्यांमधील धडधड ऐकू येत होती. एरव्ही रस्त्यांवर वाहनांची व नागरिकांची गर्दी दिसत असते. मात्र शनिवारी कुठेही गर्दी दिसली नाही. आवश्यक साहित्याची वाहनांमधून वाहतूक केली जात होती. कामगारांनाही नियम पाळूनच काम करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.

जुने बेळगाव येथे वाहनांची तपासणी

राष्ट्रीय महामार्गावरून शहरात येणाऱया वाहनांची कसून तपासणी करण्यात येत होती. येडियुरप्पा मार्गावरून शहरात येणाऱया वाहनांची जुनेबेळगाव कॉर्नर येथे तपासणी केली जात होती. त्याठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले होते. पोलिसांकडून चौकशी पूर्ण झाल्यानंतर वाहने शहरात सोडण्यात येत होती. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असल्याने या परिसरात शुकशुकाट पहायला मिळाला.

शहराच्या उत्तर भागात शांतता

बेळगाव शहराच्या उत्तर भागात कमालीची शांतता दिसून आली. सिव्हील हॉस्पिटल रोड येथे रुग्णांची ये- जा वगळता इतरत्र शुकशुकाट होता. कोर्ट रोड, नेहरू नगर, कॉलेज रोड, चन्नम्मा चौक, शिवबसवनगर, शाहूनगर, बॉक्साईड रोड, एपीएमसी रोड, शिवाजीनगर, गांधीनगर, जाधवनगर येथील रस्ते ओस पडले होते.

Related Stories

शांतीसागर महाराजांवर काढावे पोस्टल तिकीट

Patil_p

फिनाईल विक्रीच्या नावाखाली विजापुरात दरोडा

Patil_p

पॅसेंजरसाठी खुद्द रेल्वेमंत्र्यांकडे गाऱहाणे

Amit Kulkarni

वेफोरायझरच्या 125 यंत्रांचे निलजी येथे वितरण

Amit Kulkarni

शनिवारी कोरोनाचे 56 नवे रुग्ण

Patil_p

अय्यप्पा दर्शनासाठी कोरोना तपासणी सक्तीची

Patil_p
error: Content is protected !!