Tarun Bharat

‘या’ कारणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालचा दौरा केला रद्द

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उद्या कोविड-19 परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला उद्याचा दौरा रद्द केला आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ट्वीट संदेशात म्हणाले की,  उद्या, कोविड-19 परिस्थितीबाबत उच्च स्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. माझ्या अध्यक्षतेखाली ही  बैठक होणार आहे. त्यामुळे, मी पश्चिम बंगालला जाणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले. 


दरम्यान, सध्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका सुरु आहेत. सातव्या आणि आठव्या टप्प्यातल्या निवडणुकांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालमध्ये जाणार होते.


पश्चिम बंगालमध्ये पाच टप्प्यातल्या निवडणुका पार पडल्या आहेत. आज निवडणुकीचा सहावा टप्पा पार पडला. 26 एप्रिलला, सातव्या टप्प्यात 5 जिल्ह्यातल्या 36 जागांसाठी मतदान होईल. तर आठव्या टप्प्यातलं मतदान 29 एप्रिलला होणार आहे.

Related Stories

आता सर्वसामान्यांना रिझर्व्ह बँकेत खाते उघडता येणार

Archana Banage

मदतशिबिरातून हिंदूंना हाकलले

Patil_p

पंजाबमध्ये शिवसेना-शीख संघटनेत संघर्ष, दगडफेकीनंतर पोलिसांवर तलवार हल्ला

datta jadhav

पाणीपुरवठा, घरफाळा, इस्टेट वसुलीत फेल; वर्ष संपत आले तरी 50 टक्केही वसुली होईना

Abhijeet Khandekar

अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला अर्थमंत्री

Patil_p

देशात 75,809 नवे कोरोना रुग्ण; एकूण रूग्णसंख्या 42.80 लाखांवर

datta jadhav