Tarun Bharat

‘या’ कारणासाठी आम्ही राहुल गांधींचं ते ट्वीट केलं डिलिट; Twitter चे हायकोर्टात स्पष्टीकरण

Advertisements


नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम

दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांचे फोटो ट्विटरवर ट्वीट करणे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना चांगलेच महागात पडलेआहे. कारण राहुल गांधी यांच्या ट्विटवर आक्षेप घेत ट्विटरने त्यांचे अकाऊंट तात्पुरते सस्पेंड केलं होतं. याप्रकरणी आता राहुल गांधींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी दिल्ली हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर बुधवारी सुनावणी पार पडली.

मुख्यन्यायाधीश धीरूभाई नारनभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने बुधवारी कार्यकर्ते मकरंद सुरेश म्हादलेकर यांच्या याचिकेवर सुनावणी केली, ज्यामध्ये राहुल गांधींविरोधात बाल न्याय कायदा, २०१५ च्या कलम ७४ आणि कलम २३ (२) बाल प्रतिबंधक कायद्यानुसार एफआयआर नोंदवण्याची मागणी करण्यात आलेली आहे. लैंगिक अपराध कायदा (POCSO) 2012 पासून, दोन्ही तरतुदींमध्ये असे आदेश देण्यात आले आहेत की गुन्ह्यात बळी पडलेल्या मुलाची ओळख उघड केली जाणार नाही.हायकोर्टात झालेल्या सुनावणी दरम्य़ान Twitter ने स्पष्ट केले की, दिल्लीतील ९ वर्षीय बलात्कार पीडितेच्या आई-वडीलांचे फोटो काँग्रसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी ट्वीट केले होते. मात्र ते फोटो नंतर हटवण्यात आले. यामुळे राहुल गांधी यांनी Twitter च्या धोरणांचे उल्लंघन केले आहे. Twitter ने आता राहुल गांधी यांचे ट्विटर अकाउंट ब्लॉक केले आहे. मुख्य न्यायाधिश डीएन पटेल आणि न्यायमूर्ती ज्य़ोती सिंह यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.

हायकोर्टाने आता राहुल गांधी, दिल्ली पोलीस आणि ट्विटरला आपली बाजू मांडण्यासाठी सांगितेल आहे. यासाठी पुढील सुनावणीदरम्यान तिघांनाही आपले प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. या प्रकरणातील पुढील सुनावणी २७ सप्टेंबर रोजी होणार आहे.

दिल्लीच्या नांगल गावात ९ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी तिच्या कुटुंबीयांचा फोटो राहुल गांधी यांनी ट्विटरवर शेअर केला होता. याप्रकरणी राष्ट्रीय बाल हक्क आयोगने ट्विटरला नोटीस पाठवली होती. राहुल गांधी यांनी शेअर केलेला फोटो आयोगाने डिलीट करण्यास सांगितला होता. या फोटोंमुळेच राहुल गांधी अडचणीत सापडले आहेत. कारण कायद्यानुसार कोणत्याही बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांची ओळख जगजाहीर करणे गुन्हा आहे.

Related Stories

अनेक क्षेत्रांना लवकरच आर्थिक पॅकेज मिळणार

Patil_p

रोहित रंजन याचिकेवर आज सुनावणी

Patil_p

चाचणीनंतरच संशयितावर अंत्यसंस्कार

Patil_p

तृणमूल नेत्याच्या अडचणीत वाढ

Patil_p

जगभरातील कोरोनाबळींची संख्या 4 लाखांपार

datta jadhav

कोरोनाचा उद्रेक : महाराष्ट्रात 23,350 नवे रुग्ण; 328 मृत्यू

Tousif Mujawar
error: Content is protected !!