Tarun Bharat

या घडय़ाळात 12 वाजतच नाही

Advertisements

स्वीत्झर्लंडमधील घडय़ाळाची अजब तऱहा

सर्वसाधारणपणे आमच्या देशात 12 हा आकडा नकारात्मक मानला जातो. तुमच्या चेहऱयावर बारा का वाजले आहेत असे लोक अनेकदा विचारत असतात. पण जगात एक असे घडय़ाळ आहे, ज्यात कधीच 12 वाजत नाहीत. यामागील सत्य जाणून घेतल्यावर तुम्ही अवाप् व्हाल. हे अजब घडय़ाळ स्वीत्झर्लडच्या सोलोथर्न शहरात आहे. या शहराच्या टाउन स्क्वेयरवर एक घडय़ाळ बसविण्यात आले आहे. या घडय़ाळात तासाकरता केवळ 11 अंकच आहेत. त्यातून 12 हा अंक गायब आहे.

तसेही येथे आणखीन अशी अनेक घडय़ाळे आहेत, ज्यात 12 वाजत नाहीत. या शहरातील लोकांना 11 या अंकाबद्दल प्रचंड आत्मियता आहे. येथील बहुतांश गोष्टींचे डिझाइन 11 अंकांच्या आसपास फिरणारे असते. या शहरात चर्च आणि चॅपल्सची संख्या प्रत्येकी 11 आहे. याचबरोबर संग्रहालय, टॉवर देखील 11 क्रमांकाचे आहेत.

तेथील सेंट उर्सूसच्या मुख्य चर्चमध्ये देखील 11 क्रमांकाचे महत्त्व तुम्हाला स्पष्टपणे दिसून येईल. हे चर्च 11 वर्षांमध्ये तयार झाले होते. तेथे तीन जिन्यांचा सेट असून प्रत्येक सेटमध्ये 11 पायऱया आहेत. याचबरोबर येथील 11 दरवाजे आणि 11 घंटी देखील आहेत.

येथील लोकांना 11 या क्रमांकाबद्दल इतके प्रेम आहे की ते स्वतःचा 11 वा वाढदिवस विशेषप्रकारे साजरा करतात. त्या दिवशी देण्यात येणाऱया भेटवस्तू देखील 11 क्रमांकाशीच संबंधित असतात.

Related Stories

मंगळ ग्रहासारख्या ठिकाणी वास्तव्याची संधी

Patil_p

इजिप्तची ऐतिहासिक शाही परेड

Patil_p

पुतिन यांच्यावर आयुष्यभर कोणताही खटला चालवता येणार नाही

datta jadhav

अमेरिकेच्या चौकशी पथकास चीनने प्रवेश नाकारला

prashant_c

फिनलंडमध्ये आढळली पाषाणयुगातील कब्र

Patil_p

गलवानमध्ये 60 हून अधिक चिनी सैनिक ठार

Patil_p
error: Content is protected !!