तरुण भारत

‘या’ तारखेपासून राज्यात कोरोनाचे निर्बंध हटणार

मुंबई प्रतिनिधी

राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या कमी होत आहे.कोरोनामुळे मागील दोन वर्ष निर्बंधात असणाऱ्या नागरिकांना एक आनंदाची बातमी आहे. येत्या १ एप्रिलपासून कोरोनासंबंधीचे सर्व निर्बंध मागे घेण्यात येणार आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.१ एप्रिलपासून आपत्कालीन कायदा मागे घेण्यासाठी प्रक्रिया सुरू होईल. पण असं असलं तरीही मास्क वापरणं हे अनिवार्य आहे. मास्कशिवाय कोणीही बाहेर फिरताना दिसेल तर त्यांच्यावर कारवाई होईल अशीही माहिती टोपेंनी दिली आहे.

दरम्यान, यावेळी प्रत्येकाने लसीकरण करून घेणे आवश्यक आहे . लोकांकडून वारंवार रेल्वे, बस, मॉल्स यासंबंधी निर्बंध शिथील करण्याच्या मागण्या आल्या. त्यावर आता सकारात्मक विचार करण्यात आला असून १ एप्रिलपासून करोनाचे सर्व निर्बंध काढण्यात आले आहेत. असं टोपे म्हणाले आहेत.

Advertisements

Related Stories

”CM नाही PM बदला”

Abhijeet Shinde

पुणे विभागातील 5 लाख 77 हजार 927 कोरोनामुक्त!

Rohan_P

पोलिसांना सॅनिटायझर आणि गरजूंना एक हात मदतीचा

prashant_c

सर्वसामान्यांना दिलासा; गृहोपयोगी वस्तूंवरील जीएसटी कमी

datta jadhav

अनिल देशमुख यांच्याविरोधात 7000 पानांचे आरोपपत्र

datta jadhav

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाचे रोहित पवार यांनी केले स्वागत

prashant_c
error: Content is protected !!