Tarun Bharat

‘या’ दिवशी होणार जेईई ॲडव्हान्सची परीक्षा : शिक्षणमंत्र्यांची घोषणा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :


केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी  गुरुवारी जेईई ॲडव्हान्स 2021 परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. 


ते म्हणाले, ही परीक्षा आयआयटी खरगपूरतर्फे 3 जुलै रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी लागणारी 75 टक्केची अट रद्द करण्यात आली आहे. केंद्र सरकारने जेईई मेन 2020 परीक्षेमध्ये क्वालिफाय झालेल्या पण कोरोनामुळे दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना जेईई ॲडव्हान्स 2021 च्या परीक्षेला बसण्याची परवानगी दिली आहे. 

यावेळी पोखरियाल यांनी या वर्षीच्या जेईई ॲडव्हान्स2021 परीक्षेची तारीख जाहीर करताना मागील वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. जेईई मेन 2020 जेईई ॲडव्हान्स2020 परीक्षेला पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना यंदाची जेईई ॲडव्हान्स 2021 परीक्षा देता येणारअसल्याचेही यावेळी स्पष्ट केले. 

Related Stories

प्रमोशनच्या आनंदात ड्रिंक

Patil_p

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; आता आयकर विभागाच्या रडारवर

Archana Banage

RBI चा मोठा निर्णय; रेपो रेटबाबत घोषणा

Archana Banage

नितीशकुमार-तेजस्वी यादव यांच्यात पुन्हा मतभेद

Patil_p

देशाला मिळाली तिसरी ‘वंदे भारत ट्रेन’

Archana Banage

दिल्लीत रायसीना डायलॉगला प्रारंभ

Patil_p