मालकाचा मृत्यू, कब्रवरून हटेना पाळीव मांजर
माणूस आणि प्राण्यांमधील नाते अत्यंत विशेष असते. सर्वात प्रामाणिक प्राणी श्वान असतो असे म्हटले जाते. याप्रकरणी मांजरांचे नाव काहीसे खराब आहे. परंतु सर्बियामध्ये एक असे मांजर आहे, ज्याने या गोष्टीला चुकीचे ठरविले आहे. मांजराने मालकाचा मृत्यू झाल्यावरही त्याची साथ सोडली नाही आणि कडाक्याच्या थंडीतही त्याच्या कब्रवर जात राहते.


हे मांजर स्वतःच्या मालकाच्या कब्रनजीक दिसून येते. शेख मुआमेर जुकरोली यांचा 6 नोव्हेंबर 2021 रोजी मृत्यू झाला होता. परंतु त्यांचे मांजर जुकरोली यांच्यावरील अंत्यसंस्कारानंतरही त्यांच्या कब्रवरून हटण्यास तयार नव्हते. हे मांजर तेथेच येरझाऱया घालताना किंवा नजीक बसलेले दिसून येते. मालकाचा मृत्यू झाल्यावरही त्याच्या नजीक बसून राहण्याची या मांजराची इच्छा आहे.
या मांजराची छायाचित्रे असलेल्या पोस्टला सोशल मीडियावर प्रचंड पसंती मिळाली आहे. हजारो लोकांनी याला लाइक आणि रीट्विट केले आहे. 2 महिन्यांननंतरही हे मांजर स्वतःच्या मालकाच्या कब्रनजीक बसून असल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी सोशल मीडियावर लोकांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.