Tarun Bharat

‘या’ शहरात पेट्रोल पंपावर मिळतेय कोरोना लस

ऑनलाईन टीम / औरंगाबाद :

राज्यात 100 टक्के कोरोना लसीकरण करण्याच्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने यापूर्वी पेट्रोल पंपावर ‘नो वॅक्सिन ने पेट्रोल’चा आदेश लागू केला होता. त्यामुळे लस घेतल्याचे प्रमाणपत्र पाहूनच येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल दिले जात हेते. लस न घेणाऱ्यांना पेट्रोल दिले जात नव्हते. मात्र, आता औरंगाबाद आरोग्य प्रशासनाने पेट्रोल पंपावरच लसीकरण उपलब्ध करुन दिले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात कमी प्रमाणात होत असलेल्या लसीकरणाची दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लसीकरणासाठी कठोर नियमांची घोषणा केली. पेट्रोल पंपावर ‘नो वॅक्सिन ने पेट्रोल’चा आदेश लागू केला होता. ज्या पंपांवर या आदेशाचे उल्लंघन होईल, त्या पंपांवर त्यांनी कारवाईही केली. मात्र, आता थेट पेट्रोल पंपावरच लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. औरंगाबाद पेट्रोल पंप असोसिएशन आणि औरंगाबाद जिल्हा प्रशासनाच्या वतीने शुक्रवारपासून शहरातील जवळपास सर्वच पेट्रोल पंपवर लसीकरण कॅम्प लावण्यात आले आहेत. पेट्रोल घेण्यासाठी आलेल्या ज्या ग्राहकांनी लस घेतली नाही त्यांना जागेवरच लस घेण्याची सुविधा उपलब्ध होत असल्याने लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशा प्रकारे लसीकरणाचा हा देशातील पहिलाच उपक्रम आहे.

Related Stories

2020 आपत्ती वर्ष जाहीर करा-आमदार खाडे

Archana Banage

औषधांवरील साडेसहा कोटींचा कर माफ; पंतप्रधान मोदींचे मानले आभार

Archana Banage

महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा 341 वर

prashant_c

ममता बॅनर्जींचा अपघातच, हल्ला नव्हे

Amit Kulkarni

कोल्हापूर जिल्ह्यात येण्यासाठी १३ हजार ७३० जणांची नोंदणी

Archana Banage

Krishna-Marathwada Irrigation Scheme : कृष्णा-मराठवाडा सिंचन योजनेला ११७३६ कोटींचा सुधारित अर्थसंकल्प मंजूर

Abhijeet Khandekar