Tarun Bharat

युएईत विदेशी पर्यटकांना प्रवेश मिळणार

Advertisements

इराणमध्ये मास्क परिधान करणे अनिवार्य : जगभरात 1 कोटी 17 लाख 69 हजार 618 कोरोनाचे रुग्ण

जगभरात कोरोना विषाणूची लागण आतापर्यंत 1 कोटी 17 लाख 56 हजार 373 जणांना झाली आहे. तर 5 लाख 41 हजार 488 रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे. संयुक्त अरब अमिरातने (युएई) विदेशी पर्यटकांना प्रवेशाची मंजुरी दिली आहे. परंतु पर्यटकांना कोरोनापासून बचावाचे काही नियम मानावे लागणार आहेत. युएईत संबंधित पर्यटकाची पूर्ण तपासणी केली जाणार आहे. पर्यटकांना कुठेही जाण्यापूर्वी फेसमास्क वापरावा लागणार आहे. तसेच सॅनिटायजर सोबत बाळगावा लागेल.

 इराणमध्ये नवे नियम

इराणमध्ये घराबाहेर पडल्यावर मास्क परिधान करणे अनिवार्य करण्यात आले आहे. इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांनी नव्या नियमांची घोषणा केली आहे. नव्या नियमानुसार कोरोनापासून बचावाच्या नियमांचे पालन करणे आणि मास्क परिधान केला तरच लोकांना शासकीय सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच सरकारी कर्मचाऱयांनाही याचे पालन करणे सक्तीचे असेल.

बीजिंग शहराला दिलासा

बीजिंगमध्ये मागील एक महिन्यात पहिल्यांदाच मंगळवारी कोरोनाचा नवा रुग्ण सापडलेला नाही. जूनच्या पहिल्या आठवडय़ात शहरातील शिनफैडी घाऊक बाजारपेठेत नवे रुग्ण सापडले होते. तेव्हापासून शहरात 335 बाधित आढळून आले आहेत. नवा क्लस्टर मिळाल्यावर संसर्गाचा दुसरा टप्पा सुरू होण्याची भीती सतावत होती. याचदरम्यान मंगळवारी नॅशनल कॉलेज परीक्षेस मंजुरी देण्यात आली आहे. बीजिंग शहरातही ही परीक्षा पार पडली आहे. कठोर लॉकडाऊनमुळे शहरातील संसर्ग आटोक्यात आल्याचे मानले जात आहे.

पंतप्रधानांवर टीकास्त्र

ब्रिटनमधील केअर होम्स संसर्ग रोखण्याच्या दिशानिर्देशांचे पालन करत नसल्याचे विधान पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मंगळवारी केले आहे. जॉन्सन यांच्या या विधानावर टीका होत आहे. केअर होम्समध्ये संसर्गापासून बचावासाठी योग्य कपडे आणि अन्य आवश्यक सामग्री देत नाही. केअर होम्ससंबंधी जॉन्सन यांनी केलेले विधान चुकीचे असल्याचे विरोधी पक्षांनी म्हटले आहे.  ब्रिटनमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 44,236 बळी गेले असून यातील 20 हजार जण केअर होम्समध्ये दाखल होते.

महापौरांना लागण

अमेरिकेतील अटलांटाच्या महापौर किशा लान्स बॉटम्स यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना संसर्गाची कुठलीच लक्षणे दिसून आली नसली तरीही चाचणी अहवाला पॉझिटिव्ह आला आहे. अटलांटामध्ये पूर्ण खबरदारी बाळगूनही लागण झाल्याने विषाणू किती फैलावलाय हे दिसून येत असल्याचे त्या म्हणाल्या.

दोन प्रांतांमधील सीमा बंद

ऑस्ट्रेलियाने स्वतःच्या व्हिक्टोरिया आणि न्यू साउथ वेल्स या दोन प्रांतांमधील सीमा बंद करणार आहे. दोन आठवडय़ांमध्ये या दोन प्रांतांमध्ये देशातील 95 टक्के रुग्ण आढळले आहेत. पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि एनएसडब्ल्यूचे प्रीमियर ग्लॅडिज बेरेजिक्लियन यांच्यासोबत मिळून हा निर्णय घेतल्याची माहिती व्हिक्टोरियाचे प्रीमियर डॅनियल ऍन्ड्रय़ूज यांनी दिली आहे.

सर्बियाच्या नागरिकांवर बंदी

ग्रीसने महामारी पाहता सर्बियातून येणाऱया लोकांवर 15 जुलैपर्यंत बंदी घातली आहे. सर्बियामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु ग्रीस सरकारने ब्रिटनमधून येणाऱया आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणांना स्वतःच्या सर्व विमानतळांवर उतरण्याची अनुमती दिली आहे. सर्बियाने बहुतांश देशांच्या पर्यटकांना प्रवेशाची अनुमती दिली आहे. लोकांना देशात येण्याची मंजुरी दिल्यावर नियमांमध्ये गरज भासल्यास बदल केला जाऊ शकतो असे म्हटले गेले आहे.

ब्राझील अध्यक्षांमध्ये कोरोनाची लक्षणे

ब्राझीलचे अध्यक्ष जायर बोल्सोनारो यांच्यात कोरोना संसर्गाची लक्षणे दिसून आली आहेत. 65 वर्षीय बोल्सोनारो यांच्या रक्तातील प्राणवायू पातळी 96 टक्के आढळली आहे. अध्यक्षांनी स्वतःच्या सर्व बैठका रद्द केल्या असून हायड्रॉक्सी क्लोरोक्विन औषध घेण्यास प्रारंभ केला आहे. एक दिवसापूर्वीच त्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करविली होती. तसेच संसर्ग झाला नसल्याचा दावा केला होता.

पाकिस्तानात आर्थिक संकट

महामारीमुळे पाकिस्तानात 50 टक्क्यांपेक्षा अधिक लोकांना नोकरी गमवावी लागली आहे किंवा त्यांचे वेतन कमी करण्यात आले आहे. डन अँड ब्रॅडस्ट्रीट पाकिस्तान आणि गॅलअप पाकिस्तानच्या अहवालात हा खुलासा झाला आहे. सर्वेक्षणात 1,200 जणांना सामील करण्यात आले होते.सुमारे 18 टक्के लोकांनी टाळेबंदीमुळे नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याचे म्हटले आहे. तर स्थिती अशीच राहिल्यास नोकरी गमवावी लागू शकते अशी भीती 59 टक्के लोकांनी व्यक्त केली आहे. कमी उत्पन्नगटातील लोकांच्या रोजगारावर याचा सर्वाधिक प्रभाव पडला आहे.

Related Stories

प्रियांका राधाकृष्णन ठरल्या न्यूझीलंडमधील भारतीय वंशाच्या पहिल्या मंत्री

datta jadhav

न्यूयॉर्क : ब्रॉन्क्स प्राणी संग्रहालयातील वाघिणीला कोरोनाची लागण

prashant_c

कार्यालयीन कामासह जगाची सैर

Patil_p

पार्टीतील गोळीबारात न्यूयॉर्कमध्ये 2 ठार

Patil_p

फ्रान्समध्ये कोरोना चाचणी होणार मोफत

datta jadhav

अमेरिकेत स्थिती गंभीर

Patil_p
error: Content is protected !!