Tarun Bharat

युक्रेनचे लष्करी विमान कोसळले; 22 जणांचा होरपळून मृत्यू

ऑनलाईन टीम / क्यिव : 

युक्रेनच्या लष्कराचे An-26 हे विमान खार्खिवमधील चुहुइव्ह विमानतळावर उतरताना कोसळले. या दुर्घटनेनंतर लागलेल्या भीषण आगीत प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांसह 22 जणांचा होरपळून मृत्यू झाला. 2 जण जखमी झाले असून, 4 जण अद्याप बेपत्ता आहेत. युक्रेनच्या संरक्षण विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे.

युक्रेनच्या लष्करी विमानातून एव्हीएशन स्कूलचे विद्यार्थी प्रवास करत होते. 21 विद्यार्थी, 7 विमानातील क्रू मेंबर्स असे एकूण 28 जण प्रवास करत होते. हे विमान विमानतळावर उतरत असताना कोसळले. स्थानिक वेळेनुसार रात्री 8 वाजून 45 मिनिटांनी ही घटना घडली. हा अपघात नेमका कशामुळे झाला याच कारण अद्याप समोर आले नाही. या प्रकरणी सध्या बचावकार्य सुरू असून, चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

विमान धावपट्टीवर कोसळल्यानंतर विमानाने पेट घेतला. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे.

Related Stories

जेडीएस नेते मधु बंगारप्पांचा काँगेसमध्ये प्रवेश

Archana Banage

कुंभोज हातकणंगले रोडवर फोर व्हिलर गाडी पलटी; कोणतीही जीवित हानी नाही

Abhijeet Khandekar

राज्यातील सलीम शेख, सुधीर तळेकर, बॉस्को जॉर्ज यांना पोलीस पदक जाहीर

Abhijeet Khandekar

सांगलीत रंगणार महिलांची ‘महाराष्ट्र केसरी’

datta jadhav

‘एस-400’चे क्षेपणास्त्र लक्ष्य हुकून कोसळल्याचा व्हिडीओ

Patil_p

अमेरिका : ‘ग्रीन कार्ड’च्या प्रतिक्षेतील भारतीयांना दिलासा

datta jadhav