Tarun Bharat

युक्रेनच्या मदतीसाठी सरसावली आयएईए

त्वरित तांत्रिक सहकार्य देण्याची तयारी

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षादरम्यान इंटरनॅशनल ऍटोमिक एनर्जी एजेन्सीचे महासंचालक राफेल मारियानो ग्रासी यांनी युक्रेनचा दौरा करत त्वरित तांत्रिक सहकार्य उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या  तांत्रिक सहकार्यामुळे आण्विक प्रकल्पांची सुरक्षा निश्चित होणार आहे. तसेच पर्यावरण आणि लोकांसाठी धोकादायक ठरू शकतील अशा दुर्घटना रोखता येणार आहेत.  युक्रेनच्या आण्विक प्रकल्पांना सुरक्षा प्रदान करणे हाच महासंचालकांच्या दौऱयाचा उद्देश आहे.

खारकीव्ह आण्विक संशोधन प्रकल्पात आण्विक सामग्री गोळीबारानंतरही सुरक्षित राहिली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. चेर्नोबिल आण्विक प्रकल्पात बसविण्यात आलेल्या सेफगार्ड मॉनिटरिंग सिस्टीममधून ट्रान्समिशन डाटा न मिळाल्याने तेथील संपर्कयंत्रणा काम करत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ही सेफगार्ड सिस्टीम आण्विक सामग्रीला ट्रक करण्यासाठी कार्यान्वित केली जात असते.

चेर्नोबिल आण्विक प्रकल्पात 21 मार्चपासून तांत्रिक कर्मचाऱयांमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नसल्याचे युक्रेनने आयएईएला कळविले होते. पुढील रोटेशन कधी होणार हे युक्रेनलाही माहित नाही. आयएईएकडून देण्यात आलेल्या तांत्रिक सहकार्यामुळे युक्रेनला लाभ हेणार असल्याचे ग्रासी यांनी म्हटले आहे.

जगातील सर्व अणुऊर्जा प्रकल्पांवर इंटरनॅशनल ऍटोमिक एनर्जी एजेन्सी देखरेख ठेवते. आण्विक प्रकल्पावर कुठल्याही मोठय़ा हल्ल्याचे भयावह परिणाम असू शकतात. 80 च्या दशकात चेर्नोबिल आण्विक प्रकल्पात दुर्घटना झाली होती. या दुर्घटनेदरम्यान प्रकल्पाचे छत उडून गेले होते. अशा स्थितीत सर्वात मोठा धोका किरणोत्सर्ग वाढण्याचा असतो.

Related Stories

रशियाकडून तात्पुरता युद्धविराम

datta jadhav

इम्रान खान यांचा सैन्यासोबत पुन्हा ‘पंगा’

Patil_p

स्वीत्झर्लंडमधील अनोखी परंपरा

Patil_p

जगातील सर्वात उंच ऑब्जर्व्हेशन व्हील दुबईत

Patil_p

नेपाळ नरमला, भारतीय वृत्तवाहिन्यांवरील बंदी हटविली

Patil_p

अलाउलात पर्यटकांना मिळणार प्रवेश

Patil_p