Tarun Bharat

युक्रेनने आत्मसमर्पण केल्यास चर्चा शक्य

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज दुसरा दिवस असून, रशियाकडून हल्ल्यांची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे युक्रेनची वाताहत होत आहे. त्यातच रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनीही युद्ध संपण्याच्या आशा फेटाळून लावल्या आहेत. युक्रेनच्या सैन्याने आत्मसमर्पण केल्यास वाटाघाटी होतील, असे लावरोव्ह यांनी म्हटले आहे.

लावरोव्ह म्हणाले, आम्ही युक्रेनसोबत वाटाघाटी करण्यास तयार आहोत. युक्रेन सैन्याची शरणागती. या एका अटीवरच आम्ही चर्चेला तयार आहे. त्यामुळे युक्रेन सैन्याने शस्त्र खाली ठेवावे. व्लादिमीर पुतीन यांनी केलेली कारवाई युक्रेनचं लष्करीकरण आणि नाझीकरण रोखण्यासाठी करण्यात आली आहे. युक्रेनवर कब्जा करण्याचा रशियाचा कोणाचाही इरादा नाही, असेही ते म्हणाले.

दरम्यान, युद्धाच्या दुसऱ्या दिवशी रशियाकडून हल्ल्यांची तीव्रता वाढली आहे. राजधानी कीव्हमध्ये सकाळी 7 मोठे स्फोट झाले. लोक रात्रभर घरे, भुयारी मार्ग आणि भूमिगत आश्रयस्थानांमध्ये लपले. खाण्यापिण्यापासून ते दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे.

Related Stories

मतमोजणीविरोधात ट्रम्प न्यायालयात

datta jadhav

एलईटी, जैश अन् पाक सैन्यामुळेच सरशी

Patil_p

युक्रेन तात्पुरते सोडण्याचा भारतीयांना आदेश

Patil_p

श्रीलंकेत 12 ते 15 वयाच्या मुलांचे लसीकरण सुरू

Patil_p

गुगलमुळे सापडला 500 सायकलींचा चोर

Patil_p

8 श्वान असलेले कुटुंब ‘व्हायरल’

Patil_p
error: Content is protected !!