Tarun Bharat

युक्रेनमधील भारतीयांचं लवकरच एअरलिफ्ट

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद सरकारकडून विशेष उड्डाणे चालवण्यात येणार आहेत. लवकर तेथील भारतीयांना एअरलिफ्ट केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सीसीएस बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. त्यामुळे युपेनच्या युद्धक्षेत्रात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे. युक्रेनला लागून असलेल्या 4 देशांतून भारतीय विद्यार्थ्यांनाही बाहेर काढण्यात येणार आहे. हे देश हंगेरी, रोमानिया, स्लोव्हाक रिपब्लिक आणि पोलंड आहेत. या देशांच्या सीमेवर भारतीय दूतावासानं छावण्या उभारल्या आहेत. भारतीय विद्यार्थी रस्त्यानं या देशांमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना कतारमार्गे भारतात आणलं जाईल. यासाठी दोहा येथील भारतीय दूतावासानं सर्व तयारी केली आहे. युक्रेनमधून भारतीय नागरिकांना परत आणण्यात तेथील अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाची पथके युक्रेनलगतच्या हंगेरी, पोलंड, रोमानिया आणि स्लोव्हाक रिपब्लिक या देशांमध्ये पाठविली जाणार आहेत. युपेनमधील नागरिकांनी या पथकांमधील व्यक्तींशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आलं आहे.

Related Stories

उपलब्ध ऑक्सिजन अत्याधिक आवश्यक वस्तू म्हणून वापरा

Patil_p

75 टक्के रेटिंगसह मोदी जगात लोकप्रिय

Patil_p

इस्लामशी क्रिकेटचे काय देणेघेणे? मूर्ख आहे मंत्री

Amit Kulkarni

कृषी कायद्यात ‘दोष’ नाहीतच!

Patil_p

दिल्लीकरांना बसला ‘मुसळधार’चा फटका

Amit Kulkarni

FCRA कायदा कठोर, केंद्राकडून 7 मोठ्या सुधारणा

datta jadhav