Tarun Bharat

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी रशियाच्या 130 बसेस सज्ज

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

युद्धग्रस्त युक्रेनच्या खार्किव आणि सुमी या शहरांमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणि इतर परदेशी नागरिकांना बाहेर काढण्यासाठी रशियाच्या 130 बसेस सज्ज आहेत. रशियाचे राष्ट्रीय संरक्षण नियंत्रण केंद्राचे प्रमुख कर्नल जनरल मिखाईल मिजिंतसेव्ह यांनी यासंदर्भात माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा करून युक्रेनच्या संघर्षग्रस्त भागातून भारतीय नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यावर चर्चा केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी रशियाचे राष्ट्रीय संरक्षण नियंत्रण केंद्राचे प्रमुख कर्नल जनरल मिखाईल मिजिंतसेव्ह यांनी भारतीय आणि इतर परदेशी नागरिकांना युक्रेनमधील खार्किव आणि सुमी शहरांमधून रशियाच्या बेलगोरोड प्रदेशात नेण्यासाठी 130 रशियन बसेस सज्ज असल्याचे सांगितले.

दरम्यान, गुरूवारी रशियाने युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी 6 तास युद्ध थांबविण्याची माहिती दिली होती. खार्किवमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनच्या लष्कराकडून मानवी ढाल बनवल्याचा आरोप होत असताना ही भारतीय जनतेसाठी दिलासा देणारी बातमी आहे.

Related Stories

”गेली ७५ वर्षे कलम ३७० होते, तेव्हा काश्मीरमध्ये शांतता होती काय ?”

Abhijeet Khandekar

स्पर्म डोनेशनने जन्म, शोधून काढली 63 भावंडं

Amit Kulkarni

”बडबड वीरांनी आता तरी आपली पोच ओळखून बाता माराव्यात”

Archana Banage

देवेंद्र फडणवीसांची बदनामी करणारा अटकेत

Tousif Mujawar

भटकंतीला आयुष्य मानणारे जोडपे

Patil_p

अमेरिकेत रेल्वे दुर्घटना, 3 जणांचा मृत्यू

Patil_p