Tarun Bharat

युक्रेनमध्ये अमेरिकेकडून जैविक अस्त्रांची निर्मिती?

खुलाशानंतर रशियाने मागितले स्पष्टीकरण : चीन संतप्त

रशियाचे हल्ले सुरू झाल्यापासूनच पुतीन प्रशासन अमेरिका युक्रेनमध्ये जैविक अस्त्रs तयार करत असून याकरता त्याने अनेक प्रयोगशाळा स्थापन केल्याचा दावा करत आहे. याचदरम्यान अमेरिकेच्या विदेश विषयक सचिव व्हिक्टोरिया नूलँड यांनी अमेरिका युक्रेनसोबत मिळून जैविक संशोधन केंद्रांना रशियाच्या हातात पडण्यापासून रोखण्यासाठी काम करत असल्याचे म्हटले आहे. नूलँड यांनी युक्रेनमध्ये जैविक प्रयोगशाळा असल्याची पुष्टी दिल्याने खळबळ उडाली आहे. रशिया आणि चीनने याप्रकरणी अमेरिकेकडून स्पष्टीकरण मागितले आहे.

युक्रेमधील जैविक अस्त्रांयच नियमांच्या उल्लंघनांच्या पुष्टीमुळे आम्ही चिंतित आहोत असे उद्गार अमेरिकेतील रशियाचे राजदूत अनातोली एंटोनोव्ह यांनी काढले आहेत. याप्रकरणी युक्रेन आणि अमेरिकेकडून जागतिक कराराचे उल्लंघन करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

विशेष स्वरुपात धोदादायक रोगजन्य विनाशाबद्दल माहिती असून यात प्लेग, अँथेक्स, टुलारेमिया आणि अन्य घातक आजारांचे विषाणू सामील आहेत. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली सैन्य जैविक कार्यक्रमाच्या अंतर्गत लविवि, खारकोव्ह आणि पोल्टावामध्ये 30 हून अधिक प्रयोगशाळा धोकादायक संक्रामक एजंटांसह काम करत असल्याचे रशियाकडून म्हटले गेले आहे.

याचदरम्यान चीनच्या विदेश मंत्रालयाने कथित जैविक प्रयोगशाळांसंबंधी लवकरात लवकर खुलासा करण्याचे आवाहन अमेरिकेला केले आहे. युक्रेनचे अधिकरी या प्रयोगशाळांमध्ये अध्ययन करण्यात आलेल्या विषाणू-जिवाणूंना नष्ट करत आहेत असे रशियाच्या सैन्याने म्हटले होते.

Related Stories

या नात्याला काय नाव द्यावे

Patil_p

अमेरिकन नौदलाचा भारतीय हद्दीत विनापरवाना सराव

datta jadhav

13 तासांची मोहीम, पाकिस्तानी टोळधाड पसार

Patil_p

लेबननच्या पंतप्रधानांसह सर्व मंत्र्यांचा राजीनामा, सरकार पायउतार

datta jadhav

तालिबानच्या भागात लष्कर-ए-तोयबाचा शिरकाव

Patil_p

ब्राझील : संसर्ग पुन्हा तीव्र

Omkar B