Tarun Bharat

युजीसी-नेट चे नवीन वेळापत्रक जाहीर

Advertisements

दिल्ली प्रतिनीधी

युजीसीनेट परीक्षेसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) शुक्रवार, 22 ऑक्टोबर रोजी डिसेंबर 2020 आणि जून 2021 साठी परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर केल्या. या परीक्षा नोव्हेंबर 20,21,22,24,25,26,29,30 आणि डिसेंबर 01,03,04 आणि 05 या तारखेला होत आहेत

राष्ट्रीय स्‍तरावर घेतल्या जाणाऱ्या युजीसी-नेट(UGC-NET) परीक्षा कोरोनामुळे बराच काळ प्रलंबित होत्या. परीक्षा वारंवार स्‍थगित होत असल्‍यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. त्यामुळे आता नॅशनल टेस्टिंग एजन्‍सी (एनटीए) गेल्या वर्षभर विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जात होती .एनटीएकडून सुधारीत वेळापत्रकांची घोषणा केली असुन सुधारित वेळापत्रकानुसार ही परीक्षा २० नोव्‍हेंबर ते ५ डिसेंबर दरम्‍यान घेतली जाणार आहे.

दरवर्षी युजीसीमार्फत एनटीएकडून घेतल्या जाणाऱ्या या परीक्षा देशभर होतात.सहाय्यक प्राध्यापक होण्याकरीता वर्षातून दोन वेळा होणाऱ्या या परीक्षेचे वेळापत्रक कोरोना महामारीमुळे डिसेंबर २०२० आणि जून २०२१ विस्कळीत झाले होते .वर्षभर परीक्षांना मुहुर्त लागत नव्हता तरी ऑक्‍टोबरमध्ये होणाऱ्या या परीक्षा अन्‍य परीक्षा नियोजित असल्‍याने तसेच उमेदवारांनी विनंती अर्ज केल्‍याने स्‍थगित केली गेली होती.

Related Stories

ज्येष्ठ नेते शरद पवार शनिवारी कोल्हापुरात

Archana Banage

अथणी शुगर्सच्या 20 व्या गळीत हंगामास प्रारंभ

Patil_p

बिहारमध्ये 32 जणांचा संशयास्पद मृत्यू

datta jadhav

आता सकाळच्या सत्रातही बेंगळूरला विमानसेवा

Patil_p

क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड राज्यातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना

Archana Banage

कोल्हापूर : श्री महालक्ष्मी तलावाचा बंधारा बनतोय कमकुवत; तज्ञांच्या सल्ल्याने मजबुतीकरणाची गरज

Archana Banage
error: Content is protected !!