Tarun Bharat

युट्युबवरील त्या व्हिडिओप्रकरणी अंनिसने पोलिसांत केली तक्रार

Advertisements

प्रतिनिधी / सातारा :


संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे रहस्य या नावाने युटय़ूबवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांचा सहभागाचा अत्यंत खोटा व खोडसाळ उल्लेख करून काही व्हिडीओ सोशल मिडीयामध्ये जाणीवपूर्वक पसरवले जात आहे. त्याबाबत सायबर पोलीस ठाणे पुणे यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज केला असल्याची माहिती अंनिसचे प्रशांत पोतदार यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.


त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे रहस्य या नावाने युटय़ूबवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांचा सहभागाचा अत्यंत खोटा व खोडसाळ उल्लेख करून काही व्हिडीओ सोशल मिडीयामध्ये जाणीवपूर्वक पसरवले जात आहे. याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन पुणे यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज अंनिसचे मिलिंद देशमुख, दाखल करण्यात आला आहे.

दरवर्षी आषाढी वारीच्या निमित्ताने वारकऱयांमध्ये व समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याच्या हेतूने अत्यंत चुकीच्या व दिशाभूल करणाऱया व्हॉट्सऍप, फेसबुक तत्सम पोस्ट, व्हिडीओ, आदी साहित्य सोशल मिडीयाद्वारे डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या नावाने तसेच महाअंनिसच्या कार्यकर्त्यांचा उल्लेख करून पसरवले जातात, अशा स्वरूपाच्या पसरवल्या जाणाऱया अफवांवर जनतेने विश्वास ठेऊ नये. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती हवी असल्यास अथवा सत्यता जाणून घेण्याची इच्छा असल्यास महाराष्ट्र अंनिसच्या सातारा येथील मध्यवर्ती कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र अंनिसच्या राज्य बुवाबाजी संघर्ष विभागाच्या सदस्य नंदिनी जाधव, भगवान रणदिवे, केदारीनाथ सुरवसे, चंद्रकांत उळेकर, कमलाकर जमदाडे यांनी केले आहे.

Related Stories

चिंताजनक : पुण्याच्या तुलनेत सातारचा पॉझिटिव्हीटी रेट जास्त

datta jadhav

मंदिरे खुली करण्यासाठी भाजपाचा कराडात घंटानाद

Patil_p

कोल्हाटीवस्तीमध्ये समस्यांचा डोंगर

Patil_p

35 मोबाईल चोरणारा अल्पवयीन चोरटा जेरबंद

Patil_p

चोवीस तासात आवळल्या दुचाकी चोरटय़ांच्या मुसक्या

Patil_p

सातारा : पिसाणीजवळ पर्यटकांची बस पलटी

datta jadhav
error: Content is protected !!