Tarun Bharat

युथ रेड क्रॉस शताब्दी इमारत बांधकामस्थळी जिल्हाधिकाऱयांची भेट

प्रतिनिधी / बेळगाव

जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी रेड क्रॉस शताब्दी इमारतीच्या बांधकामस्थळी सदिच्छा भेट दिली. गणेशपूर येथील निजलिंगप्पा शुगर इन्स्टिटय़ूटच्या बाजुला या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. जिल्हाधिकारी हे इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या बेळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष आहेत. या भेटी दरम्यान जिल्हाधिकाऱयांनी बांधकामाबाबत समाधान व्यक्त केले.

बेळगाव जिल्हा परिसरात रेड क्रॉस कौतुकास्पद उपक्रम राबवित आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. बांधकामासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकप्रतिनिधी, शैक्षणिक संस्था यांच्याकडून अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

निर्मिती केंद्र बेळगाव या इमारतीचे बांधकाम पाहत आहेत. या बहुउद्देशीय शताब्दी संकुलात रेड क्रॉस कार्यालय, कार्यशाळा केंद्र, प्रशिक्षण केंद्र याची अत्याधुनिक व्यवस्था असणार आहे. यासोबतच आपत्ती व्यवस्थापक केंद्र, रक्तपेढी, वैद्यकीय प्रयोगशाळा, प्रथमोपचार प्रशिक्षण केंद्र आदी आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

यावेळी इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे बेळगाव शाखा चेअरमन अशोक बदामी, सचिव डॉ. डी. एन. मिसाळे, खजिनदार विनोदीनी शर्मा यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. जी. शिरयोगीमठ, विकास कलघटगी, एस. एन. मुलीमणी, प्रिया पुराणिक, प्रा. बसवराज कोळूचे, डॉ. अमित चिंगळी, प्रा. अवधूत मानगे, यावेळी उपस्थित होते. निर्मिती केंद्र बेळगावच्या संचालकांचीही यावेळी उपस्थिती होती.

Related Stories

गांधीनगरजवळ सव्वादोन किलो गांजा जप्त

Patil_p

भाग्यनगर येथील तरुणी बेपत्ता

Amit Kulkarni

तालुक्मयात खरीप हंगामाची धांदल सुरू

Patil_p

सीमाप्रश्नाची पुढील सुनावणी २३ नोव्हेंबर

Rohit Salunke

मार्गशीर्ष गुरुवार पूजेसाठीचे साहित्य दाखल

Amit Kulkarni

कंग्राळी बुद्रुक शिवप्रतिष्ठानतर्फे बलिदान मासास प्रारंभ

Patil_p