Tarun Bharat

युद्धस्मारक ठिकाणी हुतात्मा पित्याला वाहिली श्रद्धांजली

वडिलांच्या हौतात्म्यावेळी केवळ 3 वर्षे वय : 7 वर्षांनी  केला युद्धस्मारकाचा दौरा

वृत्तसंस्था  / नवी दिल्ली

कोल्हापूरमधून दिल्लीत पोहोचलेली 10 वर्षीय शेया जेव्हा राष्ट्रीय युद्धस्मारकाच्या ठिकाणी पोहोचली, तेव्हा तिच्या डोळय़ांमध्ये स्वतःच्या वडिलांच्या शौर्याची झलक स्पष्टपणे दिसून येत होती. श्रेयाने स्वतःच्या वडिलांविषयी केवळ स्वतःची आई सुगंधा यांच्याकडून जाणून घेतले होते. शेया केवळ 3 वर्षांची असताना तिचे वडील उत्तम भिकले नियंत्रण रेषेवर देशाचे रक्षण करताना हुतात्मा झाले होते.

शेयाने सोमवारी स्वतःच्या आईसोबत युद्धस्मारकाला भेट देत स्वतःच्या हुतात्मा वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे. स्वतःच्या वडिलांप्रमाणेच शेया मोठेपणी भारतीय सैन्यात सामील होण्याची इच्छा बाळगून आहे.

पती हुतात्मा झाले तेव्हा आमच्या विवाहाला 6 वर्षे झाली होती, 3 वर्षांची मुलगी होती. शेया स्वतःच्या वडिलांबद्दल विचारणा करायची, तेव्हा कशाप्रकारे आणि का स्वतःच्या वडिलांना गमावले हे तिला समजाविणे अवघड होते. परंतु आता ती समजून घेते. राष्ट्रीय युद्धस्मारकात येत मुलीने स्वतःच्या वडिलांना अधिक जवळून जाणून घेतल्याचे वीरपत्नी सुगंधा यांनी सांगितले आहे.

18 मे 2014 रोजी सैनिक उत्तम भीकले जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये तैनात असताना त्यांना भूसुरुंग स्फोटाचा आवाज ऐकू आला. तक्षणी त्यांनी बचावपथकासह त्या दिशेने धाव घेतली. इंजिनियर रेजिमेंटच्या सैनिकांना ते वाचवत असताना दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला होता. भीकले यांनी शौर्याचा परिचय देत दहशतवाद्यांचा सामना केला आणि जखमी सैनिकांना वाचविण्याचे कार्य केले. दहशतवाद्यांची एक गोळी भीकले यांच्या छातीत घुसल्याने त्यांना हौतात्म्य पत्करावे लागले होते. उत्तम यांना मरणोत्तर सैन्य पदकाने गौरविण्यात आले आहे.

Related Stories

कोरोनावर आयुर्वेदिक लस आणणार : बाबा रामदेव

datta jadhav

महंत नृत्य गोपालदास यांची प्रकृती बिघडली

Patil_p

ईशान्येत प्रियंका, दक्षिणेत राहुल गांधी

Patil_p

5 भारतीय शांतिसैनिकांचा होणार मरणोत्तर गौरव

Patil_p

दिल्लीत 2,706 नवे कोरोना रुग्ण; 69 मृत्यू

Tousif Mujawar

”शेवटच्या व्यक्तीला बाहेर काढत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही”

Abhijeet Khandekar