Tarun Bharat

युद्ध संपविण्याचे पोप यांचे आवाहन

रशिया-युक्रेन युद्धात मोठय़ा प्रमाणावर जीवितहानी

रशियाकडून युक्रेनवर मागील 40 दिवसांहून हल्ले सुरू आहेत. मागील काही दिवसांमध्ये बूचा शहरात आतापर्यंत 400 हून अधिक मृतदेह सापडले आहेत. या सर्वांचे हात मागे बांधून त्यांना रशियाच्या सैनिकांकडून गोळय़ा घालण्यात आल्या होत्या. याचदरम्ना पोप फ्रान्सिस यांनी युक्रेनच्या बूचा शहरातून आणले गेलेल्या युक्रेन ध्वजाची पाहणी करत युद्ध संपविण्याचे आवाहन पुन्हा केले आहे.

पोप फ्रान्सिस यांनी 6 युक्रेनियन मुलांचे स्वागत करत त्यांना चॉकलेट ईस्टर दिले आहे. या मुलांसाठी आणि सर्व युक्रेनियन नागरिकांसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन पोपनी केले आहे. युद्धाने आम्हाला काय दिले, ही मुले याचे उदाहरण आहेत. या मुलांना सुरक्षित ठिकाणापर्यंत पोहोचविण्यासाठी स्वतःचे घर सोडावे लागले आणि हजारो किलोमीटर अंतरावर जावे लागल्याचे पोप फ्रान्सिस यांनी म्हटले आहे.

Related Stories

पंतप्रधान मोदी बुंदेलखंड एक्स्प्रेस वे चे उद्घाटन करणार

Patil_p

भूस्खलन दुर्घटनेत केदारनाथमध्ये 1 ठार

Patil_p

दिलासादायक : कोरोनामुक्ती दरात भारत अव्वल स्थानी

Tousif Mujawar

अरूण जेटली, सुषमा स्वराज, जॉर्ज फर्नाडिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण

Archana Banage

पावसाचा जोर आजपासून ओसरणार

Patil_p

कोरोना स्थितीत सुधार; ‘या’ राज्यातील शाळा-कॉलेज होणार सुरू

Tousif Mujawar