Tarun Bharat

”युद्ध सुरू झाल्यापासून आम्हांला मदत मिळालेली नाही”

400 भारतीय विद्यार्थ्यांनी केला आरोप

Advertisements

ऑनलाईन टीम / तरुण भारत

गेले 10 दिवस युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरु असुन यामुऴे युक्रेनमध्ये अऩेक देशातील नागरिक, विद्यार्थी अडकल्याने जगातील अनेक देश चिंतेत आहेत. या युद्धात अत्तापर्यंत दोन्ही देशांकडून क्षेपणास्त्राचा वापर झाला असुन दोन्ही देश एकमेकांचे सर्वंकष नुकसान करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. यातुन जगाला ही हे युद्धाला ही चिंता लागली असुन हे युद्ध कोणत्या स्तरापर्यंत पोहोचणार याची धास्ती आहे. यातच युक्रेनमधील सुमी विद्यापीठात अडकलेल्या ४०० हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांनी आपल्याला कोणती ही मदत मिळालेली नसल्याचा आरोप केला आहे.

तीन फेब्रुवारीपासुन रशियाने युक्रेनमध्ये विध्वंसक हल्ले आणखी तीव्र केल़े आहेत. यामुळे आठवडय़ाभरातच शेकडो इमारती उद्ध्वस्त झाल्या असून, दोन हजार नागरिकांचा बळी गेल्याची माहिती युक्रेन सरकारने दिली़ आहे. रशियाने याबाबत पुढचे पाऊल उचलले आहे. याच कीव्हबरोबरच, खार्कीव्ह आणि अन्य मोठ्या लोकसंख्येच्या शहरांना लक्ष्य केले असुन नागरीकांचे निवारा तळे, पाण्याच्या टाक्या यांच्यावर हल्लासत्र सुरुच ठेवले आहे. खार्कीव्हमधील लाख लोकसंख्येच्या या शहरात तसेच पोलीस आणि गुप्तवार्ता विभाग मुख्यालय यावर बुधवारी बॉम्बहल्ला केला़.

रशियन सीमेजवळील युक्रेनमधील ईशान्येकडील शहर सुमी येथील सुमी विद्यापीठात अडकलेल्या ४०० हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांनी आरोप केला आहे की युद्ध सुरू झाल्यापासून त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. भारतीय दूतावासाने त्यांना जागेवर राहण्यास सांगितले आहे परंतु सरकारकडे त्यांच्यासाठी काही निर्वासन योजना आहे का, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. विद्यापीठातील आठ विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे भारत सरकारला त्यांची सुटका करण्याची विनंती केली.

Related Stories

सोलापुरात आज 49 कोरोनाबाधित रुग्णांची भर, 6 जणांचा बळी

Abhijeet Shinde

देशात ६० हजाराहून अधिक जणांना कोरोनाची लागण

Abhijeet Shinde

खा-प्या अन् बिल क्रिप्टोद्वारे भरा

Patil_p

शिंजो आबे यांच्या हत्या प्रकरण : जपानच्या मंत्र्याचा राजीनामा

Abhijeet Khandekar

रुपाली चाकणकर यांना कार्यालय पेटवून देण्याची धमकी

Rohan_P

किसान क्रेडीट कार्डवर पशुधन मिळणार – विशालकाका पाटील

Abhijeet Shinde
error: Content is protected !!