क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित वरिष्ठांच्या यु. जी. चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीच्या सामन्यात टिळकवाडी क्रिकेट क्लबने ग्लॅडिएटर संघाचा 46 धावंनी तर युनियन जिमखाना संघाने गोकाक क्रिकेट क्लबचा 51 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. ओमकार पाटील टिळकवाडी, रोहित देसाई युनियन जिमखाना यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
जिमखाना मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिला उपांत्य सामन्यात टिळकवाडी संघाने प्रथम फलंदाजी करताना 19.2 षटकात सर्व बाद 135 धावा केल्या. त्यात शिवलिंग सन्मानी 42, ओमकार पाटीलने 33 तर रवी पिल्लेने 16 धावा केल्या. ग्लॅडिएटरतर्फे उमर वाणी 3, आयुब मुन्नोळी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना ग्लॅडिएटर्स संघाचा डाव 16.2 षटकात 89 धावात आटोपला. त्यात सिद्धेश साळवी 18, अंजार 17 धावा केल्या. टिळकवाडीतर्फे दीपक बिल व ओमकार पाटील प्रत्येकी 3 गडी तर रवी पिल्ले यांनी 2 गडी बाद केले.


दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात युनियन जिमखाना संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 137 धावा केल्या. त्यात रोहित देसाई 58, चंदन कुंदरनाडने 18 धावा केल्या. गोकाकतर्फे अनिल नाईकने 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल गोकाक क्रिकेट क्लब संघाचा डाव 14.5 षटकात सर्व बाद 86 धावा आटोपला. त्यात फयाज सिद्दिकी 23, वसीम मारीहाळ 16 धावा केल्या. युनियन जिमखानातर्फे राहुल नाईक व वसंत शहापूरकर यांनी प्रत्येकी 3 तर संदीप चव्हाण व जगजीवन सिंग यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.